कार, बस, ट्रकमधील जास्तीच्या टायरला स्टेपनी असं नाव का पडलं? क्वचितच कुणाला माहीत असेल उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 15:28 IST2026-01-09T15:26:10+5:302026-01-09T15:28:03+5:30
Extra Tyre in Vehicles : गाडीतील या एक्स्ट्रा टायरला स्टेपनी का म्हणतात? कदाचित ९९ टक्के लोकांना हे माहीत नसेल. अशात तेच आज आपण जाणून घेणार आहोत.

कार, बस, ट्रकमधील जास्तीच्या टायरला स्टेपनी असं नाव का पडलं? क्वचितच कुणाला माहीत असेल उत्तर
Extra Tyre In Vehicles : कुठेतरी बाहेर कारने फिरायला निघालात आणि रस्त्यात मधेच कारचा टायर पंचर झाल्याचा अनुभव आपल्याला कधीना कधी आला असेलच. मग काय गाडीच्या डिक्कीतील जॅक काढून भर रस्त्यात गाडीतील एक्स्ट्रा टायर म्हणजेच आपल्या ज्याला 'स्टेपनी' म्हणतो तो लावण्याचं काम करावं लागतं. इमरजन्सीमध्ये वापरता यावी म्हणून प्रत्येक चारचाकी वाहनात ही स्टेपनी असतेच. स्टेपनी लावण्याचं काम आपणही अनेकदा केलं असेल. पण आपल्याला हे माहीत आहे का की, गाडीतील या एक्स्ट्रा टायरला स्टेपनी का म्हणतात? कदाचित ९९ टक्के लोकांना हे माहीत नसेल. अशात तेच आज आपण जाणून घेणार आहोत.
स्टेपनीची इंटरेस्टिंग कहाणी
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आजपासून 100 पेक्षा जास्त वर्षाआधी गाड्यांचं इतकं चलन नव्हतं. लंडनच्या रस्त्यांवर जेव्हा गाड्या खराब होत होत्या, तेव्हा लोकांना खूप समस्या होत होती. मधेच गाड्या बंद पडणे, पंचर होणे फारच कॉमन होतं. ऐनवेळी त्यांना पंचर काढण्यासाठी मेकॅनिक आणि गॅरेज शोधावं लागत होतं. जर कुणी भेटलं नाही तर स्वत:च टायर बदलावे लागत होते. लोकांची होणारी हीच समस्या पाहून इंग्लंडमधील दोन भावांनी एक गॅरेज सुरू केलं.
स्टेपनीचा अर्थ काय?
असं सांगण्यात येतं की, दोन्ही भावांनी दुकानाचं नाव 'स्टेपनी टायर सर्व्हिस' असं ठेवलं. मुळात हे दुकानाचं नाव दोन्ही भावांनी त्यांच्या जिल्ह्याच्या नावावरून ठेवलं होतं. या दोन भावांचं नाव वॉल्टर आणि टॉम डेविस होतं. त्यांचा बिझनेस हळूहळू वाढला. हे दुकान स्टेपनी नावाने यूरोप आणि ब्रिटिश साम्राज्यात सगळीकडे फेमस झालं. अशाप्रकारे नंतर हळूहळू एक्स्ट्रा टायरचं नाव स्टेपनी पडलं. भारतातही हा ब्रॅन्ड खूप लोकप्रिय झाला. कोणत्याही कंपनीच्या स्पेअर टायरला 'स्टेपनी' असंच म्हटलं जाऊ लागलं.
आज 100 पेक्षा जास्त वर्षानंतरही गाडीच्या एक्स्ट्रा टायरला स्टेफनी असंच म्हणतात. तसं पाहिलं तर तो एक्स्ट्रा असतो जेणेकरून वेळेवर समस्या होऊ नये. आता तर अशा अनेक गाड्या आहेत ज्यात एक नाहीतर अनेक एक्स्ट्रा टायर असतात. यात मोठे ट्रक आणि मालवाहक गाड्यांचा समावेश आहे.