विमानातून नारळ सोबत नेण्यावर असते बंदी, पण यामागचं नेमकं कारण काय असतं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 11:50 IST2025-12-30T11:26:41+5:302025-12-30T11:50:40+5:30
Reason Coconut Not Allowed In Plane: धारदार हत्यारं, पिस्तुल आणि ज्वलनशील पदार्थासहीत अनेक गोष्टी विमानात सोबत नेण्यावर बंदी असते. पण आपल्याला विश्वास बसणार नाही, एक असं फळंही आहे जे विमानात सोबत नेता येत नाही.

विमानातून नारळ सोबत नेण्यावर असते बंदी, पण यामागचं नेमकं कारण काय असतं?
Reason Coconut Not Allowed In Plane: बस असो रेल्वे असो वा विमान असो...यांमधून प्रवास करताना काही नियम घालून देण्यात आले आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे नियम बनवण्यात आले आहेत. पण आपण नेहमीच पाहतो की, बस आणि रेल्वेच्या तुलनेत विमान प्रवास करताना जास्त नियम पाळावे लागतात. वेगवेगळ्या एअरलाईन्सचे वेगवेगळे नियम असतात. पण काही कॉमन नियम सगळेच पाळतात. धारदार हत्यारं, पिस्तुल आणि ज्वलनशील पदार्थासहीत अनेक गोष्टी विमानात सोबत नेण्यावर बंदी असते. पण आपल्याला विश्वास बसणार नाही, एक असं फळंही आहे जे विमानात सोबत नेता येत नाही.
विमानात नारळ नेण्यावर बंदी, कारण...
विमानात सोबत काय काय नेण्यावर बंदी असते हे आपण कधीना कधी विमानाने प्रवास केला असेल तर माहीत असेलच. पण अनेकांना हे माहीत नसेल की, एक फळ सोबत नेण्यावरही विमानात बंदी असते. ते फळ म्हणजे वाळलेलं नारळ. विमानात प्रवास करत असताना तुम्ही सोबत नारळ नेऊ शकत नाही. याचं मुख्य कारण म्हणजे वाळलेल्या नारळात तेलाचं प्रमाण अधिक असतं. आणि तेलाला ज्वलनशील पदार्थांच्या श्रेणीत ठेवलं जातं. त्यामुळे सुरक्षेच्या कारणानं विमानात सोबत नारळ नेण्यास परवानगी नाही. तसेच नारळाचं कवच कठोर असल्याने आत काय आहे हे एक्स-रे मशीन योग्यपणे चेक करू शकत नाही. त्यामुळे चेकींगमध्ये अडथळा निर्माण होतो.
दुबईसाठी नवीन नियम
काही वर्षाआधी एअरपोर्टच्या काही नियमांमध्ये बदल करण्यात आले. हे नियम खासकरून दुबईला जाणाऱ्या प्रवाशांना पाळावे लागतात. आतापर्यंत प्रवाशी त्यांच्या आवश्यक गोष्टी जसे की, औषधं आपल्या सोबत असलेल्या बॅगमध्ये नेत होते. पण आता नव्या नियमांनुसार, आता काही औषधांवर दुबईला जाणाऱ्या उड्डाणांमध्ये बंदी घालण्यात आली आहे. प्रवाशांना या नियमांबाबत माहीत असलं पाहिजे.
विमानात सोबत काय काय नेता येत नाही?
चाकू, कात्री, ब्लेड, रेझर
बंदुका, पिस्तूल, गोळ्या (खरी किंवा खेळणी)
फटाके, स्फोटक पदार्थ
मिरची स्प्रे, पेपर स्प्रे
मोठ्या प्रमाणात द्रव (Liquids 100 ml पेक्षा जास्त)
पेट्रोल, डिझेल, केरोसीन, लायटर फ्युएल
टूल्स (हातोडा, स्क्रूड्रायव्हर इ.)