जगात कुठेही नद्या असतील तिथे पूराचा धोका कायम असतो. पूरामुळे अनेकदा विध्वंस होतो. बहुतांश नद्या समुद्राला जाऊन मिळतात परंतु समुद्राला कधी पूर येत नाही. कधी पाणीही वाढल्याचे दिसत नाही. पृथ्वीवर जवळपास दीड लाखाहून अधिक नद्या वाहतात. ज्यातील १६५ प्रमुख नद्या आहेत. यातील बऱ्याच नद्या अखेर समुद्राला मिसळतात. बांगलादेशात ७०० हून अधिक नद्या आहेत नद्यांच्या बाबतीत जगातील हा श्रीमंत देश मानला जातो.
जगभरात वाळवंट आणि लहान नद्या वगळता बहुतेक नद्या त्यांचे सर्व पाणी वाहून समुद्रात जाते. नद्या विनाशकारी पूर आणू शकतात परंतु हा पूर कितीही भयंकर असला तरी जेव्हा नद्यांचे पाणी समुद्रात जाते तेव्हा समुद्राला पूर येत नाही. मग समुद्राला पूर का येत नाही? असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. नद्यांना पूर येतो जेव्हा त्यांची पाण्याची क्षमता त्यांच्या मूळ क्षमतेपेक्षा जास्त असते. हे सहसा मुसळधार पाऊस, बर्फ वितळणे किंवा जलाशयांमधून पाणी सोडल्यामुळे होते. नद्यांची रुंदी आणि खोली मर्यादित असते त्यामुळे पाण्याची पातळी सहजपणे वाढते आणि नंतर त्यांचे काठ ओसंडून वाहते आणि भूभागावर पोहोचते, ज्याला आपण पूर म्हणतो.
७१ टक्के भागात पसरला आहे समुद्र
दुसरीकडे महासागर विशाल आणि खोल आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागाचा अंदाजे ७१ टक्के भाग महासागराने व्यापलेला आहे म्हणजेच पृथ्वीच्या पृष्ठभागाचा फक्त २९ टक्के भाग जमीन आहे. महासागराची सरासरी खोली ३,६८८ मीटर (१२,१०० फूट) आहे. याचा अर्थ तो नद्यांपेक्षा खूपच खोल आहे. महासागर इतका विशाल आकारमान आणि जागा व्यापतो की मुसळधार पाऊस किंवा नद्यांचे अतिरिक्त पाणी क्वचितच त्याच्या पातळीवर परिणाम करते. जगातील सर्वात खोल नदी मध्य आफ्रिकेत वाहते. ज्याचे नाव कांगो आहे. कांगो नदीची खोली ७५४ फूट इतकी मोजली गेली आहे. अमेझन नदी ३३० फूट एवढी आहे. भारतात गंगा नदीची खोली ३३ ते ६६ फूट इतकी आहे.
समुद्राला उधाण येते, पण...
जर सर्व नद्यांचे अधिकचे पाणी समुद्रात टाकले तर त्याची पातळी थोडी फार वाढू शकते. परंतु त्यामुळेही समुद्राला पूर येणार नाही. समुद्र त्याच्या आकाराच्या मानाने अतिरिक्त पाणी सामावून घेऊ शकतो. समुद्रात पूरासारखी परिस्थिती पाहायला मिळत नाही परंतु वादळ, त्सुनामी या कारणामुळे समुद्राला उधाण येते. त्यामुळे समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ होते. लाटा आणि हवेमुळे पाण्यात चढ उतार होत असतो. समुद्राला पूर येत नाही त्यामागे त्याची विशाल क्षमता कारणीभूत आहे. नद्यांची खोली मर्यादित असल्याने पूर येतो. समुद्राची खोली अमर्यादित आहे त्यामुळे कुठल्याही बदलाशिवाय त्यात अतिरिक्त पाणी सामावून घेण्याची क्षमता आहे.
पृथ्वीवरील २९ टक्के भाग जमिनीचा आहे. ज्यात महाद्विप, बेटे आणि इतर क्षेत्रांचा समावेश आहे. पण त्यात नद्या, हिमनद्या, पर्वत, जंगले, तलाव, वाळवंट आणि ओसाड जमीन समाविष्ट आहे. पृथ्वीवरील २९ टक्के जमिनीपैकी फक्त १०-१५ टक्के जमीन मानवी वस्तीसाठी योग्य आहे, ज्यावर मानव जगभरातील शहरे आणि खेड्यांमध्ये राहतात. शहरीकरण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नद्यांचे प्रवाह बदलत आहेत. त्यातून पूर येण्याचे धोके अधिक निर्माण झाले आहेत.
Web Summary : Rivers flood due to limited capacity, overwhelmed by rain or meltwater. Oceans, vast and deep, absorb extra water without flooding. Their immense size accommodates river influx, preventing overflow, unlike confined rivers.
Web Summary : नदियों में सीमित क्षमता के कारण बाढ़ आती है, जो बारिश या पिघले पानी से भर जाती हैं। महासागर विशाल और गहरे होने के कारण अतिरिक्त पानी को बाढ़ के बिना सोख लेते हैं। उनका विशाल आकार नदी के प्रवाह को समायोजित करता है, जिससे नदियों की तरह अतिप्रवाह नहीं होता।