जास्त आंबट खाल्ल्यावर डोळे अचानक बंद का होतात, झटका का बसतो? कारण वाचून व्हाल अवाक्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 16:09 IST2025-07-11T16:08:38+5:302025-07-11T16:09:25+5:30
Interesting Health Facts: लहान मुलांमध्ये ही क्रिया अधिक बघायला मिळते. पण असं का होतं याचा कधी तुम्ही विचार केलाय का? चला तर आज समजून घेऊ यामागचं नेमकं कारण...

जास्त आंबट खाल्ल्यावर डोळे अचानक बंद का होतात, झटका का बसतो? कारण वाचून व्हाल अवाक्...
Interesting Health Facts: आपण अनेकदा अनुभवलं असेल की, आंबट जर काही खाल्लं तर झटका बसतो आणि डोळे आपोआप बंद होतात. लिंबू, चिंच, आवळा, संत्री, कीवी यांसारखी आंबट फळं खाताना या गोष्टीचा अनुभव अनेकांना आला असेलच. लहान मुलांमध्ये ही क्रिया अधिक बघायला मिळते. पण असं का होतं याचा कधी तुम्ही विचार केलाय का? चला तर आज समजून घेऊ यामागचं नेमकं कारण...
हेल्थ एक्सपर्ट सांगतात की, जेव्हाही आपण आंबट काही खातो, तेव्हा त्यातील सिट्रिक अॅसिड किंवा टार्टरिक अॅसिड आपल्या जिभेवरील ग्रंथींना अचानक स्टिम्युलेट करतं. हे स्टिम्युलेशन थेट ट्रायजेमिनल नर्व म्हणजे नसेपर्यंत पोहोचतं. ही चेहऱ्याची सगळ्यात संवेदनशील आणि मुख्य नस असते. या नसेला टेस्ट जाणवते, सोबतच ती चेहऱ्याचे स्नायू आणि डोळ्यांच्या आजूबाजूच्या सेंसिटिविटीलाही कंट्रोल करते. ट्रायजेमिनल नर्व सक्रिय होताच, चेहऱ्याचे अनेक स्नायू आकुंचन पावतात. डोळ्यांच्या चारही बाजूच्या स्नायूंवर याचा मोठा प्रभाव होतो.
ही एक रिफ्लेक्स अॅक्शन असते, ज्याचा उद्देश असतो की, कोणत्याही संभावित नुकसानपासून किंवा जड रसायनापासून शरीराचा बचाव करावा. अनेकदा आपण पाहिलं असेल की, प्रखर सूर्य प्रकाशातही डोळे बंद होतात. आंबट काही खाल्ल्यावर केवळ डोळेच नाही तर आपल्या तोंडातील लाळ ग्रंथी सुद्धा सक्रिय होतात. तोंडाला पाणी सुटतं, जेणेकरून ते अॅसिडचा प्रभाव कमी करू शकेल आणि पचनास मदत करू शकेल. ही पूर्ण प्रक्रिया शरीराची एक सुरक्षा प्रतिक्रिया असते, जी शरीराचा बचाव करण्यासाठी असते.
आश्चर्याची बाब म्हणजे वेगवेगळ्या लोकांमध्ये ही प्रतिक्रिया एकसारखी बघायला मिळत नाही. ज्या लोकांची ट्रायजेमिनल नस जास्त संवेदनशील असते, त्यांचे डोळे काही आंबट खाल्ल्यावर झटकन बंद होतात. तोंड कसंतरी होतं. तेच काही लोकांना आंबट खाल्ल्यावर फार काही होत नाही. हे आपल्या नर्वस सिस्टीमच्या कामकाजावर आणि सहनशीलतेवर अवलंबून असतं.