Why Bats Sleep Upside Down : कोरोना काळात वटवाघुळांची चांगलीच चर्चा झाली. वटवाघुळांच्या काही प्रजातीमधून कोरोना व्हायरल पसरल्याचं बोललं जात होतं. तशी वाटवाघुळे नेहमीच चर्चेचा विषय असतात. लोकांच्या त्यांच्याबाबत बरीच उत्सुकता असते. शहरांमध्ये एखाद्या बिल्डींगच्या छताला किंवा गावा-खेड्यांमध्ये झाडांवर उलटी लटकलेली वटवाघुळे आपण अनेकदा पाहिली असतील. तेव्हा आपल्याही मनात प्रश्न आला असेल की, वटवाघुळे उलटी का लटकलेली असतात? यामागचं नेमकं कारण काय असतं, हेच आज आपण जाणून घेणार आहोत.
उलटे लटकून का झोपतात?
वटवाघुळांच्या झोपण्याच्या प्रश्नासोबत इतर पक्ष्यांप्रमाणे वटवाघुळे जमिनीवरून का उडू शकत नाहीत? असाही प्रश्न काही लोकांना पडतो. तर याचं कारण त्यांच्या पंखांमुळे मोठी झेप घेता येत नाही आणि त्यांचे मागचे पाय इतके लहान व अविकसित असतात की, धावून वेग पकडू शकत नाहीत. उलटे लटकून राहिल्यावरच त्यांना सहजपणे झेप घेता येते. वटवाघुळे सामान्यपणे अंधार असलेल्या गुहांमध्ये राहतात. ते रात्रीच बाहेर निघतात. ते झोपलेले असताना खाली का पडत नाही याचं कारण म्हणजे त्यांच्या पायांची खास बनावट. पायांचे पंजे त्यांचं वजन उचलण्यास मदत करतात.
वटवाघुळांची बनावट ही वातावरणाच्या हिशेबाने होते. काही वटवाघुळांचे पंख लांब असतात. हे लाल, काळे आणि पांढरे असतात. थायलॅंडमधील भौरा वटवाघुळे सगळ्यात कमी वजनाचे असतात. इंडोनेशियात आढळणारे वटवाघुळे 6 फुटापर्यंत पंख पसरतात. लॅटिन अमेरिकेत आढळणारे 70 टक्के वटवाघुळे केवळ रक्त पितात. कॅनडामध्ये आढळणारे वटवाघुळे कीटक खातात.
डायनॉसॉरच्या आधीपासूनचं अस्तित्व
असं सांगितलं जातं की, वटवाघुळांचं अस्तित्व डायनॉसॉरच्या आधीपासून होतं. ते सगळ्यात जास्त तापमान असलेल्या वाळवंटातही राहतात आणि सगळ्यात थंड प्रदेशातही राहतात. त्यांच्या वेगवेगळ्या प्रजातीही असतात. यांच्यात काही अद्भुत क्षमताही असतात. मेक्सिकन वटवाघुळे उंच उडू शकतात. तर लहान भुरक्या रंगाचे वाटवाघुळे झोपतात बघून वाटतं ते श्वास घेतच नाहीयेत.
काहींमध्ये खास सेन्सर
मासे पकडणाऱ्या वटवाघुळांमध्ये एक खास सेंसर असतं, त्यामुळे त्यांना इतर जीवांच्या तुलनेत मासे लवकर दिसतात. काही वटवाघुळांचे पंख मनुष्यांच्या केससारखे पातळ असतात. वटवाघुळांचा रंग केवळ काळा नसतो तर होंडुरन नावाचे वटवाघुळे पांढरे असतात. त्याचं नाक पिवळं असतं.
Web Summary : Bats hang upside down due to underdeveloped legs, aiding flight. Their feet lock onto surfaces, preventing falls. Diverse species exist, with varied diets and habitats, some dating back to dinosaur times. They possess unique sensory abilities.
Web Summary : चमगादड़ अविकसित पैरों के कारण उल्टा लटकते हैं, जिससे उड़ान में मदद मिलती है। उनके पैर सतहों पर टिक जाते हैं, जिससे वे गिरते नहीं हैं। विभिन्न प्रजातियां मौजूद हैं, जिनके अलग-अलग आहार और आवास हैं, कुछ डायनासोर के समय से हैं। उनमें अद्वितीय संवेदी क्षमताएं होती हैं।