२ डोळे असूनही एकाच डोळ्याने का बघतात कावळे? जाणून घ्या यामागचं कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 15:00 IST2026-01-16T14:55:58+5:302026-01-16T15:00:30+5:30

Interesting Facts : जवळपास सगळ्याच जीवांप्रमाणे कावळ्यांना सुद्धा दोन डोळे असतात. पण कावळे दोन डोळे असूनही एकाच डोळ्याने बघतात. कारण...

Why crow only see with their one eye know the reason | २ डोळे असूनही एकाच डोळ्याने का बघतात कावळे? जाणून घ्या यामागचं कारण...

२ डोळे असूनही एकाच डोळ्याने का बघतात कावळे? जाणून घ्या यामागचं कारण...

Interesting Facts : पृथ्वीवर वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, पक्षी आहेत. प्रत्येकाची काहीना काही खासियत असते. तर काहींच्या कमजोरी सुद्धा असतात. अनेक लोक उत्सुकता म्हणून या जीवांची माहितीही मिळवत असतात. कावळा हा तसा फारच दु्र्लक्षित पक्षी. म्हणजे त्याच्याबाबत फार कुणी चर्चा करत नाही. पण कावळ्याची एक अशी खासियत आहे, ज्याबाबत आम्ही आपल्याला सांगणार आहोत. जवळपास सगळ्याच जीवांप्रमाणे कावळ्यांना सुद्धा दोन डोळे असतात. पण कावळे दोन डोळे असूनही एकाच डोळ्याने बघतात. आता नक्कीच आपल्याला प्रश्न पडला असेल की, असं का? तर तेच उत्तर जाणून घेऊया.

कावळे एकाच डोळ्याने का बघतात?

आपल्याला कदाचित माहीत नसेल, पण कावळे एकाच डोळ्याने सगळीकडचा नजारा बघतात. बरेच लोक असं म्हणतात की, कावळ्यांना एकच डोळा असतो. पण असं अजिबात नाहीये. त्याना दोन डोळे असतात, पण ते एकाच डोळ्याने बघतात, याला मोनोक्युलर व्हिजन असं म्हणतात. कावळे एकावेळी एकाच डोळ्याने बघतात, कारण त्याना ३६० डिग्रीचा व्ह्यू दिसतो. एकच डोळा सगळीकडे फिरवून ते बघत असतात. मुळात कावळ्यांचे दोन्ही डोळे त्याच्या डोक्याच्या कोपऱ्यावर असतात आणि ते एकावेळी एकाच डोळ्याने एखाद्या गोष्टीवर फोकस करू शकतात.

ऑक्सफोर्ड यूनिव्हर्सिटीच्या एका अभ्यासानुसार, कावळे आपले डोळे चांगल्या पद्धतीने हलवतात आणि एकाच डोळ्याने एखाद्या गोष्टीकडे फोकस करतात. ही गोष्ट त्यांचा हुशारी आणि बुद्धिमत्तेचा भाग मानली जाते.

कावळे घेतात सूड

'डेली स्टार'च्या एका वृत्तानुसार, कावळेही सूड घेतात. हा दावा बर्ड्स एक्सपर्टने केला आहे. त्यांचं मत आहे की, जर कावळ्याचं वैर मनुष्यासोबत झालं तर ते साधारण १७ वर्ष लक्षात ठेवतात आणि सूड घेण्याचा प्रयत्न करत राहतात. यूनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टनचे प्रोफेसर जॉन मारजलुफ एक एन्वायरोमेंटल सायंटिस्ट आहेत.

२००६ मध्ये एक प्रयोग करण्यात आला होता. ज्याद्वारे टेस्ट करण्यात आलं की, कावळेही सूड घेतात का? त्यांना एक मास्क चेहऱ्यावर लावला आणि मग ७ कावळ्यांना एका जाळ्यात अडकवलं. पक्ष्यांची ओळख पटावी म्हणून त्यांना बॅंड बांधण्यात आले होते. काही वेळाने त्यांनी कावळ्यांना काहीच इजा न करता सोडून दिलं. जॉनने दावा केला की, सोडून दिल्यानंतरही कावळ्यांनी त्यांचा पाठलाग सोडला नाही. जेव्हाही ते मास्क लावून यूनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमधून निघत होते, तेव्हा कावळे त्यांच्यावर हल्ला करत होते.

Web Title : कौवे क्यों एक आँख से देखते हैं: जानिए कारण

Web Summary : कौवे एक समय में एक आँख का उपयोग करते हैं, जिससे उन्हें 360 डिग्री का दृश्य मिलता है। अध्ययन बताते हैं कि कौवे चेहरे याद रखते हैं और बदला लेते हैं, जो उनकी बुद्धिमत्ता और दीर्घकालिक स्मृति को दर्शाता है।

Web Title : Why Crows Appear to See with One Eye: The Reason

Web Summary : Crows possess monocular vision, using one eye at a time for a 360-degree view. Studies show crows remember faces and seek revenge, sometimes for years, demonstrating intelligence and long-term memory.