हॉटेलच्या बेडवर रंगीत पट्टी का ठेवली जाते? सजावट नाही महत्वाचं आहे कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 16:46 IST2025-07-03T16:45:28+5:302025-07-03T16:46:00+5:30

Interesting Facts : हॉटेलच्या रूममध्ये जेव्हा तुम्ही जाता तेव्हा बेडवर पायांच्या बाजूने एक रंगीत पट्टी दिसते, या रंगीत पट्टीला बेड रनर म्हटलं जातं.

Why bed runners spread in hotel beds know the reason | हॉटेलच्या बेडवर रंगीत पट्टी का ठेवली जाते? सजावट नाही महत्वाचं आहे कारण...

हॉटेलच्या बेडवर रंगीत पट्टी का ठेवली जाते? सजावट नाही महत्वाचं आहे कारण...

Interesting Facts : बाहेर कुठे फिरायला गेले असताना तुम्ही हॉटेलमध्ये कधीना कधी थांबले असालच. हॉटेलच्या रूममध्ये गेल्यावर बेडवरील पायांच्या बाजूने असलेल्या एका पातळ कापडाच्या पट्टीवर तुमचं लक्ष गेलं असेलच. पण बेडवर या पट्टीचं काम काय असतं? याचंच कारण आज आपण समजून घेऊया.

हॉटेलच्या रूममध्ये जेव्हा तुम्ही जाता तेव्हा बेडवर पायांच्या बाजूने एक रंगीत पट्टी दिसते, या रंगीत पट्टीला बेड रनर म्हटलं जातं. अनेकांना ही पट्टी पाहून हेच वाटतं की, ती केवळ सजावटीसाठी असेल. पण या पट्टीचा उद्देश वेगळाच आणि महत्वाचा असतो. 

हॉस्पिटॅलिटी एक्सपर्टनुसार, बेडवर ही पट्टी सजावटीसाठी नसते. तर बेडवरील पांढऱया बेडशीटला बॅगची धूळ-माती, शूज-चपलांची घाण किंवा बाहेरच्या कपड्यांची धूळ लागू नये. 

Homemaking.com नुसार "लोक अनेकदा हॉटेलच्या रूममध्ये जाऊन बॅग, कोट किंवा शूज थेट बेडच्या कोपऱ्यावर ठेवतात. अशात स्वच्छ अंथरूण आणि बेडशीट खराब होते. बेडशीट खराब होऊ न देण्याचं काम ही रंगीत पट्टी करते". बेडवर जर ही पट्टी असेल तर या पट्टीनं तुम्हाला एक सुरक्षित जागा देते. या रंगीत कापडानं बेडची सजावट तर वाढतेच, सोबतच ती डोळ्यांनाही आराम देते. 

एका अलिकडच्या रिपोर्टमध्ये Locksmith Dartford च्या सुरक्षा एक्सपर्टनी सांगितलं की, हॉटेलच्या रूममध्ये अशा काही जागा असतात, ज्या दिसायला स्वच्छ दिसतात, पण कीटाणूंचा अड्डा असतात. बेडस्प्रेड, डेकोरेटिव पिलो आणि थ्रो ब्लॅंकेट्स या गोष्टी अनेक दिवस धुतल्या जात नाही. ज्यांवर डेड स्किन, लाळ, शरीरातील तरल पदार्थ आणि धूळ जमा होते.

एक्सपर्टचा सल्ला आहे की, रूममध्ये शिरताच बेड रनर आणि डेकोरेटिव पिलो काढून टाका. कारण या गोष्टीही बरेच दिवस धुतल्या जात नाहीत. शॉवर सुरू करण्याआधी एक मिनिटं गरम पाणी सोडा, जेणेकरून बॅक्टेरिया निघून जातील. टीव्ही रिमोट सॅनेटाइज करा. बाथटब वापरण्याआधी शाम्पू किंवा शॉवर जेलनं स्वच्छ करा. 

Web Title: Why bed runners spread in hotel beds know the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.