विमानातील खिडकीवर छोटं छिद्र का असतं? कारण वाचून बसणार नाही विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 15:45 IST2025-06-18T15:44:27+5:302025-06-18T15:45:03+5:30

Holes In Flight Window : विमानातील खिडकीवर असलेल्या या छोट्या छिद्राला ब्लीड होल असं म्हणतात. पण हे छिद्र कशासाठी इथे दिलेलं असतं किंवा त्याचा उपयोग काय असतो हे अनेकांना माहीत नसतं.

Why are small holes made in flight windows know the reason | विमानातील खिडकीवर छोटं छिद्र का असतं? कारण वाचून बसणार नाही विश्वास

विमानातील खिडकीवर छोटं छिद्र का असतं? कारण वाचून बसणार नाही विश्वास

Holes In Flight Window :  विमानात प्रवास करतवेळी तुम्ही दिलं असेल की, खिडकीच्या काचावर खाली एक छोटं छिद्र असतं. विमानातील खिडकीवर असलेल्या या छोट्या छिद्राला ब्लीड होल असं म्हणतात. पण हे छिद्र कशासाठी इथे दिलेलं असतं किंवा त्याचा उपयोग काय असतो हे अनेकांना माहीत नसतं. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हे छिद्र कसं फायदेशीर ठरतं हे वाचून तुम्ही अवाक् व्हा...

मुळात विमानाच्या आतील आणि बाहेरच्या एअर प्रेशरमध्ये म्हणजेच हवेच्या दाबात भरपूर अंतर असतं. ज्यामुळे खिडक्यांवर दबाव वाढून त्या तुटण्याचा धोका असू शकतो. खिडकीवरील हे छोटसं छिद्र हवेच्या दाबातील अंतर कमी कऱण्यास मदत करतं. म्हणजे खिडक्यांवरील दबाव कमी करण्यास मदत मिळते. अशाप्रकारे खिडक्या सुरक्षित ठेवण्यास मदत मिळते.

विमानातील खिडक्यांवरील या छोट्याशा छिद्रामुळे खिडक्यांवर ओलावा राहत नाही. या छोट्याशा छिद्रातून हवेचा प्रवाह होतो, ज्यामुळे खिडक्यांवर ओलावा राहत नाही. ब्लीड होलमधून सतत  हवेचा फ्लो सुरू असतो, ज्यामुळे खिडक्यांवर धुकं जमा होत नाही.

या छिद्रामुळे विमानाच्या खिडक्यांवरील काच टिचकत नाही किंवा तुटत नाही. जर हे ब्लीड होल नसतील तर एअर प्रेशरमध्ये बदल होऊन खिडक्यांवर भेगा पडू शकता किंवा काच तुटू शकतात.

जर आपण ब्लीड होलचं काम पाहिलं तर ते तीन थर असलेल्या काचांपैकी मधल्या काचावर हे असतं. ज्यामुळे आतील हवा सहजपणे बाहेर जाते. ज्यामुळे एअर प्रेशरमुळे होणारा दबाव कमी होतो.
 

Web Title: Why are small holes made in flight windows know the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.