टॅबलेट्सच्या पॅकेटवर रिकामी स्पेस का दिलेली असते? कधी केलाय का विचार तुम्ही....

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2021 12:43 PM2021-09-08T12:43:02+5:302021-09-08T12:48:29+5:30

आता औषधाचं पॅकेट तर सर्वांनीच पाहिलं असेल. पण कधी तुम्ही लक्ष दिलंय का की, औषधाच्या पॅकेटवर गोळ्यांसोबतच गोळीच्या आकाराची रिकामी जागाही राहते. 

Why are the empty spaces in a medicinal tablet for | टॅबलेट्सच्या पॅकेटवर रिकामी स्पेस का दिलेली असते? कधी केलाय का विचार तुम्ही....

टॅबलेट्सच्या पॅकेटवर रिकामी स्पेस का दिलेली असते? कधी केलाय का विचार तुम्ही....

Next

औषधं तर प्रत्येक घरात आणले जातात. कारण आजकालच्या वातावरणामुळे लोकांना जास्त औषध घेण्याचं काम पडत आहे. कधी कुणाला काय होईल काहीच सांगता येत नाही. त्यामुळे डॉक्टरकडे जाण्याऐवजी लोक घरातच औषधं ठेवतात. डोकेदुखी किंवा अंगदुखी होत असेल तर लोक लगेच गोळी घेतात. आता औषधाचं पॅकेट तर सर्वांनीच पाहिलं असेल. पण कधी तुम्ही लक्ष दिलंय का की, औषधाच्या पॅकेटवर गोळ्यांसोबतच गोळीच्या आकाराची रिकामी जागाही राहते. 

सामान्यपणे इतका विचार कुणी करत नाही किंवा याकडे कुणी फारसं लक्षही देत नाहीत. त्यामुळे ही रिकामी जागा कशासाठी असते हे फारसं कुणाला माहीत नसेल. पण तुम्हाला आज आम्ही सांगणार आहोत की, औषधाच्या पॅकेटवर ही रिकामी जागा का असते. (हे पण वाचा : Toothpaste च्या ट्यूबवर जे कलर कोड्स असतात त्यांचा नेमका अर्थ काय असते?)

पॅकेटवर ही रिकामी जागा असते कारण टॅबलेट्स एकमेकात मिश्रित होऊ नये आणि केमिकल रिअॅक्शन होऊ नये. त्यासोबतच जेव्हा औषध विक्रेता औषध एका शहरातून दुसऱ्या शहरात घेऊन जातात तेव्हा ते तुटण्याची भीती असते. ही भीती पॅकेटवर स्पेस असल्याने कमी होते. ही स्पेस औषधांसाठी Cushioning Effect सारखी असते आणि याने औषध डॅमेज होत नाही. इतकंच नाही तर औषधांचं नाव चांगल्या प्रकारे प्रिंट व्हावं त्यासाठीही ही स्पेस ठेवली जाते. जेणेकरून प्रिंट करण्यासाठी चांगली जागा मिळावी. 

तुम्ही पाहिलं असेल की काही पॅकेट्समध्ये एकच गोळी असते. अशात गोळीची पूर्ण माहिती त्यावर देता यावी यासाठी ते पॅकेट मोठं केलं जातं. त्यामुळेही रिकामी स्पेस देणं गरजेचं असतं. त्यासोबतच औषधाचं पॅकेट कापताना किंवा औषध काढताना नुकसान होऊ नये यासाठीही स्पेस दिली जाते.

Web Title: Why are the empty spaces in a medicinal tablet for

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.