टेकऑफ आणि लँडिंगवेळी मांड्यांखाली हात दाबून का बसतात एअर होस्टेस? पाहा नेमकं काय असतं कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 15:02 IST2026-04-03T15:01:25+5:302026-04-03T15:02:10+5:30

Airplane Interesting facts : विमानाच्या टेकऑफ आणि लँडिंगदरम्यान एअर होस्टेस आपल्या सीटवर बसून हात मांड्यांखाली दाबून ठेवतात. खुर्चीचे बेल्ट लावलेले असताना त्या असं का करतात हे आज आपण समजून घेणार आहोत. 

Why air hostesses tug their hands below legs during landing and take off | टेकऑफ आणि लँडिंगवेळी मांड्यांखाली हात दाबून का बसतात एअर होस्टेस? पाहा नेमकं काय असतं कारण...

टेकऑफ आणि लँडिंगवेळी मांड्यांखाली हात दाबून का बसतात एअर होस्टेस? पाहा नेमकं काय असतं कारण...

Airplane Interesting facts : जमिनीपासून हजारो फूट वर आकाशात उडणाऱ्या विमानातून प्रवास करणं खरंच एक भन्नाट अनुभव असतो. अनेक नवीन गोष्टी माहिती पडतात. ज्या आपल्याला कधी माहितीच नसतात. जे लोक पहिल्यांदा विमानाने प्रवास करतात त्यांना तर बऱ्याच गोष्टी माहीत नसतात. अशीच एक विमानातील वेगळी बाब आज आम्ही आपल्याला सांगणार आहोत. विमानात प्रवाशांच्या सेवेसाठी एअर होस्टेस असतात हे आपल्याला माहीत असेलच. त्यांच्यासंबंधी ही बाब आहे. विमानाच्या टेकऑफ आणि लँडिंगदरम्यान एअर होस्टेस आपल्या सीटवर बसून हात मांड्यांखाली दाबून ठेवतात. खुर्चीचे बेल्ट लावलेले असताना त्या असं का करतात हे आज आपण समजून घेणार आहोत.

सुरक्षेचा नियम

विमानाचं टेकऑफ आणि लँडिंग दोन्ही गोष्टी खूप आवश्यक आणि संवेदनशील असतात. यावेळी कोणत्याही प्रकारच्या बेजबाबदारपणामुळे मोठी दुर्घटना होण्याचा धोका असतो. त्यामुळे यावेळी प्रवाशांसोबतच एअर होस्टेसना सीटवर बसून बेल्ट लावण्याचा निर्देश दिलेले असतात. यावेळी मांड्यांखाली हात दाबून ठेवण्याचं पहिलं कारण हे आहे की, जर विमानात अचानक झटका लागला किंवा काही घटना घडली तर त्यांना बॅलन्स ठेवता यावा आणि स्वत:ला सुरक्षित ठेवता यावं.

अचानक ब्रेक लागल्याल बॅलन्स ठेवणं

विमान जेव्हा लँड होतं तेव्हा ते झटक्याने थांबतं, ज्यामुळे शरीरावर जोर पडतो. जर एअर होस्टेसने हात मांड्यांखाली दाबलेले नसतील तर त्या पुढच्या बाजूने झटक्याने पडू शकतात. हात मांड्यांखाली दाबल्याने शरीराचा बॅलन्स कायम राहतो आणि त्या सीटवर व्यवस्थित बसू शकतात.

इमरजन्सीसाठी तयार राहणे

टेकऑफ आणि लँडिंगदरम्यान कोणत्याही प्रकारची इमरजन्सी स्थिती निर्माण होऊ शकते. अशात एअर होस्टेसना लगेच प्रवाशांच्या मदतीसाठी तयार रहावं लागतं. प्रत्येक एअरलाईन्स आपले काही सेफ्टी प्रोटोकॉल असतात, जे एअर होस्टेसना फॉलो करावे लागतात. या नियमांनुसार, टेकऑफ आणि लँडिंगवेळी सीटवर बसून हात मांड्यांखाली दाबून ठेवावे लागतात.

शारीरिक सुरक्षा आणि आराम

बराच वेळ उभे राहिल्याने एअर होस्टेसच्या पायांमध्ये वेदना किंवा थकवा जाणवू शकतो. मांड्यांखाली हात ठेवून बसल्याने पायांच्या स्नायूंना आराम मिळतो आणि ब्लड सर्कुलेशनही चांगलं होतं. एअर होस्टेस टेकऑफ आणि लँडिंगवेळी मांड्यांखाली हात ठेवून बसणं हा केवळ एक नियम नाही. हा नियम सुरक्षा आणि प्रॅक्टिकॅलिटीवर आधारित आहे. याने एअर होस्टेस आणि प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित करण्यास मदत मिळते. सोबतच इमरजन्सी स्थितींमध्ये लगेच अॅक्शन घेण्यास मदतही मिळते.

Web Title : टेकऑफ पर एयर होस्टेस जांघों के नीचे हाथ क्यों रखती हैं?

Web Summary : टेकऑफ/लैंडिंग के दौरान एयर होस्टेस संतुलन, सुरक्षा और त्वरित आपातकालीन प्रतिक्रिया के लिए जांघों के नीचे हाथ रखती हैं। इससे रक्त संचार और मांसपेशियों को भी आराम मिलता है।

Web Title : Why Air Hostesses Sit with Hands Under Thighs During Takeoff?

Web Summary : Air hostesses keep hands under thighs during takeoff/landing for balance, safety during sudden movements, and quick emergency response. It aids blood circulation and muscle relaxation too.