सगळ्यात जास्त कोणत्या प्रोफेशनचे लोक पार्टनरसोबत करतात चीटिंग? 'जासूस' महिलेनं केला खुलासा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 15:58 IST2025-01-16T15:58:07+5:302025-01-16T15:58:51+5:30
मॅडलिननं तिच्या कामाबाबत सांगितलं की, ती दगा देणाऱ्या पुरूषांना आपल्या जाळ्यात ओढते.

सगळ्यात जास्त कोणत्या प्रोफेशनचे लोक पार्टनरसोबत करतात चीटिंग? 'जासूस' महिलेनं केला खुलासा!
जगभरात लोक वेगवेगळ्या अशा प्रोफेशनमध्ये आहेत, ज्यांचा आपण कधी विचारही केला नसेल. गुन्हेगारांना पकडून देणाऱ्या जासूस म्हणजे गुप्तहेरांबाबत तर तुम्ही ऐकलं असेल. प्रायव्हेट डिटेक्टिव हेही एक जुनं प्रोफेशन आहे. मॅडलिन स्मिथ नावाची महिलाही प्रायव्हेट डिटेक्टिव आहे. पण तिचं काम गुन्हेगार पकडणं नाही तर दगा देणाऱ्या पार्टनरचा पर्दाफाश करणं आहे. मॅडलिननं तिच्या कामाबाबत सांगितलं की, ती दगा देणाऱ्या पुरूषांना आपल्या जाळ्यात ओढते. तिच्या ग्राहकांमध्ये विवाहित महिला आणि गर्लफ्रेन्ड अधिक आहेत. ज्या त्यांना या कामासाठी भरपूर पैसे देतात.
'डेली स्टार'च्या रिपोर्टनुसार, मॅडलिन स्मिथ दगाबाज पुरूषांचा पर्दाफाश करण्यासाठी सोशल मीडियाची मदत घेते. जेणेकरून त्यांच्या पार्टनरच्या शंकेच निरसन व्हावं. पैसे मिळाल्यानंतर ती नात्यात आपल्या पार्टनरला दगा देणाऱ्या पुरूषांना पकडण्याची योजना बनवते.
किती घेते पैसे?
स्मिथ गेल्या तीन वर्षांपासून ही सेवा देत आहे आणि तिने ५ हजार टेस्ट केल्या आहेत. ज्यात शेकडो लोकांना यशस्वीपणे पकडलं आहे. तिने सांगितलं की, 'ती नेहमीच संधीच्या शोधात असते'. महिला थेट तिला संपर्क करतात आणि ६५ डॉलर (५,६१४ रूपये) इतकी रक्कम देतात.
क्लाएंटला पाठवते मेसेजचे स्क्रीनशॉट
मॅडलिन सोशल मीडियाच्या माध्यमातून क्लाएंटच्या पार्टनरच्या संपर्कात येते आणि त्यांच्यासोबत झालेल्या चॅटींगचे स्क्रीनशॉट क्लाएंटला पाठवते. पार्टनरवर जास्तच नजर ठेवायची असेल तर यासाठी ती जास्त पैसे घेते. ३० वर्षीय मॅडलिननुसार, तिच्याकडे भरपूर क्लाएंट आहेत.
जास्त कोणत्या प्रोफेशनचे पुरूष दगा देतात?
आपल्या अनुभवांच्या आधारावर मॅडलिन सांगते की, पोलीस विभागात काम करणारे पुरूष दगाबाज होण्याची शक्यता सगळ्यात जास्त असते. जेव्हापासून मी हे काम सुरू केलं तेव्हापासून १०० पेक्षा अधिक पोलीस अधिकाऱ्यांना पकडून दिलं आहे. माझ्या अनुभवानुसार हे सगळ्यात जास्त दगा देणारं प्रोफेशन आहे.
मॅडलिनचा दावा आहे की, तिने १०० पोलीस अधिकाऱ्यांना पार्टनरला दगा देताना पकडलं आहे. त्यांच्या खालोखाल अग्निशमन, पॅरामेडिक्स आणि सैन्य यांचा नंबर लागतो. पर्सनल जिम ट्रेनरही यात पुढे आहेत. त्यानंतर वकिल आहेत. डॉक्टर त्यांच्या यादीत सगळ्यात खाली येतात. मॅडलिननुसार, जे पुरूष आपले बॉडी एब्स दाखवतात आणि त्यांचे फोटो शेअर करतात, तेही दगा देण्याची शक्यता असते.