When Bill Gates said, 'I had Microsoft, Melinda had many boyfriends' in Netflix documentry | जेव्हा बिल गेट्स म्हणाले होते, 'माझ्याकडे मायक्रोसॉफ्ट होती, तेव्हा मेलिंडाचे होते अनेक बॉयफ्रेन्ड'

जेव्हा बिल गेट्स म्हणाले होते, 'माझ्याकडे मायक्रोसॉफ्ट होती, तेव्हा मेलिंडाचे होते अनेक बॉयफ्रेन्ड'

मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स (Bill Gates) आणि त्यांची पत्नी मेलिंडा (Melinda Gates) यांनी २७ वर्षाच्या संसारानंतर घटस्फोट (Bill Gates Divorce) घेतलाय. दोघांनीही याची घोषणा केली. २७ वर्ष संसार करून अचानक वयाच्या या टप्प्यात दोघांनी घटस्फोट घेतल्याने लोक हैराण झाले आहेत. अशात दोघांच्या वेगवेगळ्या गोष्टींची चर्चा होता आहे. 

२०१९ मध्ये नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या 'इनसाइड बिल्स ब्रेन' सीरीजमध्ये बिल गेट्स यांच्या खाजगी जीवनाबाबत खूप काही दाखवण्यात आलं. डॉक्युमेंट्रीनुसार, मेलिंडाने १९८७ मध्ये प्रॉडक्ट मॅनेजर म्हणून मायक्रोसॉफ्ट कंपनी जॉइन केली होती. एका बिझनेस डीनर दरम्यान बिल यांची मेलिंडासोबत भेट झाली होती. (हे पण वाचा : Melinda-Bill Gates Love story : कशी होती बिल गेट्स यांची लव्हस्टोरी? इतक्या श्रीमंत माणसालाही आधी मिळाला होता नकार.....)

सुरूवातीला बिल आणि मेलिंडा त्यांच्या नात्याबाबत सिरीअस नव्हते. डॉक्युमेंट्रीमध्ये एके ठिकाणी बिल म्हणतात की, 'तिला आणखीही बॉयफ्रेन्ड होते आणि माझ्याकडे मायक्रोसॉफ्ट होती. आम्ही दोघेही एकमेकांबाबत गंभीर नव्हतो आणि ना एकमेकांसोबत राहण्यासाठी वेळ मागत होतो'. मात्र, एका वर्षाने डेटींगनंतर चित्र बदललं. (हे पण वाचा : Bill Gates divorce: 27 वर्षे साथ दिली, आता शक्य नाही! अब्जाधीश बिल गेट्स, मेलिंडाकडून घटस्फोटाची घोषणा)

एक दिवस बिल अचानक मेलिंडा यांना 'आय लव्ह यू' म्हणाले. मेलिंडानेही प्रेमाची कबूली दिली. बिल म्हणाले की, 'आम्हाला एकमेकांची काळजी होती. आमच्याकडे केवळ दोन शक्यता होत्या. एकतर आम्ही ब्रेकअप केलं असतं नाही तर लग्न'. डॉक्युमेंट्रीमध्ये मेलिंडा हसत सांगतात की, 'त्यांना याचा निर्णय घ्यावाच लागणार होता. एक दिवस मी बिलच्या रूममध्ये गेले तेव्हा तो त्याच्या व्हाइटबोर्डवर एक लिस्ट करत होता. त्यात लग्नाचे फायदे आणि तोटे लिहिले होते.

मेलिंडा यांनी सांगितले की, बिलला लग्न तर करायचं होतं. पण त्यांना कन्फ्यूजन होतं की, ते मायक्रोसॉफ्ट चालवत ते हे कसं निभावतील. तेच बिल म्हणाले की, लग्नाचा विचार त्यांनी फार गंभीरतेने घेतला होता. 
 

Web Title: When Bill Gates said, 'I had Microsoft, Melinda had many boyfriends' in Netflix documentry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.