EMI full form : EMI हा शब्द हल्ली कुणी ऐकला नाही असं कुणी सापडणार नाही. हा शब्द जणू रोजच्या जगण्याचा भाग झाला आहे. जवळपास सगळेच लोक लोन घेऊन काहीना काही खरेदी करतात. पण त्याची रक्कम एकत्र न देता हप्त्यांमध्ये म्हणजे EMI द्वारे भरली जाते. उदाहरण द्यायचं म्हणजे बरेच लोक टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीनसारख्या किंवा इतरही अनेक वस्तू EMI वर खरेदी करतात. इतकंच काय तर घरासाठी लोन घेतलं असेल तरी ते फेडण्यासाठी सुद्धा दर महिन्यात EMI भरावा लागतो. काही लोक ऑनलाईन शॉपिंग वेबसाइटवरून छोट्या छोट्या वस्तू EMI वर खरेदी करत असतात. आपणही अनेकदा काहीना काही गोष्टींसाठी EMI भरले असतील. अनेकांना हा शब्द तोंडपाठ असेल, पण गंमत ही आहे की, जास्तीत जास्त लोकांना EMI चा फुलफॉर्म माहीत नसतो. आज आम्ही आपल्याला तोच सांगणार आहोत.
EMI फुल फॉर्म काय आहे?
आजच्या काळात जास्तीत जास्त लोकांचं काम EMI शिवाय भागत नाही. भरपूर लोक एखादी महागडी वस्तू खरेदी करण्यासाठी एकत्र पैसे देऊ शकत नाही. अशात लोक त्या वस्तूची किंमत EMI द्वारे भरतात. हा शब्द तर रोजच्या जीवनातील भाग बनला आहे. पण लोक याचा फुल फॉर्म जाणून घेण्याचा फारसा विचार करत नाही. लोकांना काय वस्तू मिळण्याशी मतलब. आपण जर EMI सुरू असलेल्या अनेकांना जर विचारलं तर कुणालाही याचा फुल फॉर्म विचारला तर कुणालाही बरोबर उत्तर सांगता येणार नाही. काही लोक EMI चा फुल फॉर्म सांगतील की, 'Easy Monthly Installment' पण हा बरोबर फुल फॉर्म नाहीये. EMI चा बरोबर फुल फॉर्म Equated Monthly Installment असा आहे.
कशी झाली EMI ची सुरूवात?
आपल्याला EMI चा फुल फॉर्म तर समजलाच आहे. पण अनेकांना हेही माहीत नाही की, आज लोकांसाठी खूप फायदेशीर ठरत असलेल्या EMI ची सुरूवात कशी झाली. काही रिपोर्ट्सनुसार, EMI ची कॉन्सेप्ट अमेरिकेत सुरू झाली होती. असं सांगण्यात येतं की, १९७० दरम्यान ही कॉन्सेप्ट तिथे फेमस झाली. तर भारतात ही कॉन्सेप्ट २०१६ मध्ये फ्लिपकार्ट आणि बजाज फाइनसर्व्हसारख्या कंपन्यांनी सादर केली होती.
Web Summary : Many use EMI, but don't know the full form. It stands for Equated Monthly Installment. Started in America in the 1970s, EMI gained popularity in India around 2016, making purchases easier through installments.
Web Summary : कई लोग ईएमआई का उपयोग करते हैं, लेकिन इसका फुल फॉर्म नहीं जानते। यह इक्वेटेड मंथली इंस्टॉलमेंट है। 1970 के दशक में अमेरिका में शुरू हुआ, ईएमआई ने भारत में 2016 के आसपास लोकप्रियता हासिल की, जिससे किश्तों के माध्यम से खरीदारी आसान हो गई।