Ambulance चा फुल फॉर्म काय आहे आणि Ambulance चे प्रकार किती असतात? माहिती जी माहीत असावी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 12:27 IST2026-01-19T12:21:01+5:302026-01-19T12:27:34+5:30

Ambulance Full Form : अनेकांना हे माहीत नसतं की, Ambulance हा शब्द एक शॉर्टफॉर्म आहे. याचा फुल फॉर्म अनेकांना माहीत नसतो. तोच आज आपण जाणून घेणार आहोत.

What is the full form of ambulance and its different types | Ambulance चा फुल फॉर्म काय आहे आणि Ambulance चे प्रकार किती असतात? माहिती जी माहीत असावी

Ambulance चा फुल फॉर्म काय आहे आणि Ambulance चे प्रकार किती असतात? माहिती जी माहीत असावी

Ambulance Full Form : कुणाची जर तब्येत बिघडली किंवा एखादी गंभीर दुर्घटना घडली तेव्हा सगळ्यात आधी मनात नाव येतं ते म्हणजे अ‍ॅम्बुलन्स. ही केवळ व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये पोहोचवणारी गाडी नाही तर जीवन आणि मृत्यूच्या मधील एक महत्वाचा धागा असते. त्यामुळे रस्त्यावर पुढे जाण्यासाठी अ‍ॅम्बुलन्स मार्ग मोकळा करून दिला जातो. सायरन वाजवत जाणारी अ‍ॅम्बुलन्स आपण अनेकदा बघितली असेल. अ‍ॅम्बुलन्स हा शब्द मनात चांगलाच घट्ट बसलेला असतो. पण अनेकांना हे माहीत नसतं की, Ambulance हा शब्द एक शॉर्टफॉर्म आहे. याचा फुल फॉर्म अनेकांना माहीत नसतो. तोच आज आपण जाणून घेणार आहोत.

अ‍ॅम्बुलन्सचा फुल फॉर्म काय आहे?

अ‍ॅम्बुलन्स हा शब्द लॅटिनमधील Ambulare शब्दातून आलेला आहे. ज्याचा अर्थ होतो चालणे. पण मेडिकल विश्वात याचा फुल फॉर्म वेगळाच आहे. जो सामान्य लोकांना फारसा माहीत नसतो. Ambulance चा फुल फॉर्म ‘Automobile for Medical Care in Urgent Life-Threatening Situations and Non-Emergency Transportation’ असा वापरला जातो. म्हणजे हे एक वाहन आहे ज्याचा वापर आपातकालीन आणि गैर-आपातकालीन अशा दोन्ही प्रकारच्या मेडिकल सेवांमध्ये केला जातो. याचा मुख्य उद्देश रूग्णाला लवकर आणि सुरक्षित हॉस्पिटलपर्यंत पोहोचवणे आणि रस्त्यात आवश्यक उपचार देणे.

किती प्रकारच्या असतात अ‍ॅम्बुलन्स?

हल्ली रूग्णाची स्थिती आणि गरजेनुसार अनेक प्रकारच्या अ‍ॅम्बुलन्स उपलब्ध असतात. ज्यांच्या सेवा आणि भाडे दोन्ही वेगवेगळे असतात.

बेसिक लाइफ सपोर्ट अ‍ॅम्बुलन्स

ही एक सामान्य आणि बेसिक अ‍ॅम्बुलन्स असते. यात ऑक्सीजन सिलेंडर, फर्स्ट एड-किट, स्ट्रेचर आणि बेसिक मेडिकल उपकरणं असतात. ही अशा रूग्णांसाठी असते, ज्यांची स्थिती फार गंभीर नसते म्हणजे जीवाला फार धोका नसलेल्या रूग्णांसाठी. या अ‍ॅम्बुलन्ससाठी साधारणपणे १ हजार ते ३ हजारांपर्यंत भाडे असू शकतं. हे आपण कुठे राहता यावर देखील अवलंबून असतं.

अ‍ॅडव्हान्स्ड लाइफ सपोर्ट अ‍ॅम्बुलन्स

ही अ‍ॅम्बुलन्स अधिक गंभीर अवस्थेतील रुग्णांसाठी असते. यामध्ये व्हेंटिलेटर, मॉनिटर, डिफिब्रिलेटर आणि प्रशिक्षित पॅरामेडिकल कर्मचारी असतात. हृदयविकाराचा झटका, गंभीर अपघात किंवा श्वसनास अडचण यांसारख्या परिस्थितींमध्ये या अ‍ॅम्बुलन्सचा वापर केला जातो. याचे भाडे साधारण ५ हजार ते १० हजार दरम्यान असतं.

मोबाइल आयसीयू

याला चालतं-फिरतं आयसीयू असंही म्हणता येईल. यामध्ये आयसीयूमधील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असतात, जसे की व्हेंटिलेटर, कार्डियाक मॉनिटर, आपत्कालीन औषधे आणि तज्ज्ञ वैद्यकीय कर्मचारी. गंभीर रुग्णांना एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यासाठी याचा वापर केला जातो. सुविधांचा दर्जा अधिक असल्यामुळे याचे भाडे इतर अ‍ॅम्बुलन्सपेक्षा जास्त असते, १५ ते २० हजारापर्यंत याचं भाडे असतं.

एअर अ‍ॅम्बुलन्स

रुग्णाला फार दूर किंवा तातडीने मोठ्या रुग्णालयात हलवणे आवश्यक असेल, तेव्हा एअर अ‍ॅम्बुलन्सचा वापर केला जातो. ही सेवा हेलिकॉप्टर किंवा लहान विमानाच्या माध्यमातून रुग्ण वाहतूक करते. ही सेवा सर्वात जलद पण तितकीच महाग असते.

नॉन-इमर्जन्सी पेशंट ट्रान्सपोर्ट अ‍ॅम्बुलन्स

या प्रकारची अ‍ॅम्बुलन्स अशा रुग्णांसाठी असते, ज्यांना डायलिसिस, नियमित तपासणी किंवा रुग्णालयातून डिस्चार्जनंतर घरी नेण्यासाठी वाहतूक करायची असते. यामध्ये आपत्कालीन उपकरणे नसतात, पण रुग्णाची सुरक्षितता आणि आराम याची पूर्ण काळजी घेतली जाते.

Web Title : एम्बुलेंस का फुल फॉर्म और प्रकार: जरूरी जानकारी जो आपको पता होनी चाहिए

Web Summary : एम्बुलेंस, लैटिन शब्द 'एम्बुलारे' से जिसका अर्थ है 'चलना', आपात स्थितियों के लिए महत्वपूर्ण है। इसका फुल फॉर्म 'Automobile for Medical Care in Urgent Life-Threatening Situations and Non-Emergency Transportation' है। प्रकारों में बेसिक लाइफ सपोर्ट, एडवांस्ड लाइफ सपोर्ट, मोबाइल आईसीयू, एयर एम्बुलेंस और नॉन-इमरजेंसी पेशेंट ट्रांसपोर्ट शामिल हैं, प्रत्येक विशिष्ट आवश्यकताओं को पूरा करते हैं और लागत में भिन्न हैं।

Web Title : Ambulance Full Form and Types: Important Information You Should Know

Web Summary : Ambulance, from Latin 'Ambulare' meaning 'to walk,' is vital for emergencies. The full form is 'Automobile for Medical Care in Urgent Life-Threatening Situations and Non-Emergency Transportation.' Types include Basic Life Support, Advanced Life Support, Mobile ICU, Air Ambulance, and Non-Emergency Patient Transport, each catering to specific needs and varying in cost.