एखादी कविता किंवा धड्यापेक्षा कमी नाही Bangkok चं पूर्ण नाव, वाचता वाचता वळेल बोबडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 15:05 IST2025-07-15T15:04:59+5:302025-07-15T15:05:50+5:30

Bankok Full Name : बॅंकॉकबाबत आपल्याला सुद्धा बऱ्याच गोष्टी माहीत नसतील. पण या शहराबाबत एक गोष्ट आहे ज्याबाबत क्वचितच कुणाला माहीत नसेल.

What is the full and real name of Bankok city from Thailand | एखादी कविता किंवा धड्यापेक्षा कमी नाही Bangkok चं पूर्ण नाव, वाचता वाचता वळेल बोबडी

एखादी कविता किंवा धड्यापेक्षा कमी नाही Bangkok चं पूर्ण नाव, वाचता वाचता वळेल बोबडी

Bankok Full Name : थायलॅंडची राजधानी बॅंकॉक शहराचं नाव ऐकलं नसेल असं क्वचितच कुणी सापडेल. बऱ्याच लोकांचं स्वप्न असतं की, आयुष्यात एकदातरी बॅंकॉकला फिरायला जायला मिळावं, बरेच लोक तर जाऊनही आले असतील. येथील लाइफस्टाईल, नाइट क्लब, हायटेक गोष्टी यामुळे हे शहर पर्यटकांच्या ट्रॅव्हल लिस्टमध्ये वरच्या क्रमांकावर असतं. बॅंकॉकबाबत आपल्याला सुद्धा बऱ्याच गोष्टी माहीत नसतील. पण या शहराबाबत एक गोष्ट आहे ज्याबाबत क्वचितच कुणाला माहीत नसेल. इतकंच काय तर या गोष्टीचा तुम्ही कधी विचारही केला नसेल. कारण बॅंकॉक इतकंच नाव तुमच्यासाठी पुरेसं आहे.

बॅंकॉकचं पूर्ण आणि अधिकृत नाव

सामान्यपणे जर परदेशात कुठं फिरायला जाण्याचं प्लॅनिंग सुरू असेल किंवा असंच कुठं जायचं असा विचारलं तर जास्तीत जास्त लोक बॅंकॉकचं नाव घेतील. पण अनेकांना हे माहीत नाही की, थायलॅंडची राजधानी बॅंकॉकचं खरं आणि पूर्ण नाव वेगळंच आहे. हे नाव पाहिल्यावर तुम्हाला रेल्वेच्या डब्यांसारखं लांब किंवा एखाद्या धड्यासारखं वाटेल. बॅंकॉकचं पूर्ण नाव 'Krung Thep Maha Nakhon Amon Rattanakosin Mahinthara Yuthaya Mahadilok Phop Noppharat Ratchathani Burirom Udomratchaniwet Mahasathan Amon Piman Awatan Sathit Sakkathattiya Witsanukam Prasit' आहे. 

हे बॅंकॉकचं अधिकृत आणि पूर्ण नाव आहे. हे इतकं मोठं आहे की, कुणी याचा उच्चारही करत नाही. सोबतच यातील शब्दही समजत नाहीत. त्यामुळे जास्तीत जास्त लोक थेट बॅंकॉक असाच उल्लेख करतात. 

बॅंकॉक दक्षिण पूर्व आशिया देश थायलॅंडची राजधानी आहे. इथे अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या पर्यटकांना आकर्षित करतात. मरीन पार्क आणि सफारी इथे खूप प्रसिद्ध आहे. मरीन पार्कमध्ये प्रशिक्षित  डॉल्फिन्सच्या करामती बघायला मिळतात. हे ठिकाण लहानांसोबतच मोठ्यांनाही आवडतं. सफारी वर्ल्‍ड जगातील सगळ्यात मोठं खुलं प्राणी संग्रहालय आहे. इथे तुम्ही आशिया आणि आफ्रिकेतील अनेक जीव बघू शकता.

Web Title: What is the full and real name of Bankok city from Thailand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.