Hoodie च्या लटकत राहणाऱ्या दोरीला काय म्हणतात? पाहा नेमका कधी आला हुडी ट्रेन्ड
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 13:54 IST2026-01-05T13:53:56+5:302026-01-05T13:54:33+5:30
Hoodie Interesting Facts : कधी आपण विचार केलाय का की, हुडीची स्टाईल कधीपासून सुरू झाली आणि हुडीच्या कॅपला असलेल्या लेसच्या टोकांवर मेटल, रबर किंवा प्लास्टिक लावलेलं असतं, त्याना नेमकं काय म्हटलं जातं?

Hoodie च्या लटकत राहणाऱ्या दोरीला काय म्हणतात? पाहा नेमका कधी आला हुडी ट्रेन्ड
Hoodie Interesting Facts : तरूणांमध्ये हुडीची चांगलीच क्रेझ बघायला मिळते. थंडीच्या दिवसात कूल दिसण्यासोबतच थंडीपासून बचावासाठी हुडी घातली जाते. सेलिब्रिटींपासून ते सामान्य लोकांपर्यंत ही हुडी क्रेझ बघायला मिळते. पण कधी आपण विचार केलाय का की, हुडीची स्टाईल कधीपासून सुरू झाली आणि हुडीच्या कॅपला असलेल्या लेसच्या टोकांवर मेटल, रबर किंवा प्लास्टिक लावलेलं असतं, त्याना नेमकं काय म्हटलं जातं? त्यांचं काम काय असतं? हेच आज आपण जाणून घेणार आहोत.
काय आहे हुडी, कुठून आलं नाव?
हुडी (Hoodie) एकप्रकारचा कॅज्युअल अपरविअर कपडा आहे, जो स्वेटशर्ट, स्वेटर किंवा जॅकेटसारखा असतो. याला डोकं डोकं झाकण्यासाठी एक टोपी असते, ज्याला हुड म्हणतात. हुडी आरामदायक आणि गरम असते. हिवाळ्यात हुडीचा वापर अधिक केला जातो. सोशल मीडियावर व्हायरल रिपोर्ट्सनुसार, हुडीचा आविष्कार १९३० च्या दशकात अमेरिकेत न्यूयॉर्कच्या थंडीत गोदामांमध्ये काम करणाऱ्या मजुरांसाठी झाला होता. हुडी आधी मजुरांसाठी बनवण्यात आली होती. नंतर ७० च्या दशकात हिपहॉप कल्चर आणि स्पोर्ट्स कल्चरमध्ये ही जास्त लोकप्रिय झाली.
हुडी आणि त्यातील लेस
आपल्याला असं वाटू शकतं की, ज्याप्रमाणे पायजामाला नाळा असतो, तसा हा हुडीला पण नाळा असेल. पण त्याला नाळा म्हणत नाहीत. या लेसला 'हुडी स्ट्रिंग्स (Hoodie Strings)' असं म्हणतात. त्याशिवाय त्या स्ट्रिंग्सवर मेटल, प्लास्टिक आणि रबराचं एक स्पॉपर असतं, ज्याना 'एगलेट (Aglet)' म्हणतात. हे एगलेट आपल्याला शूजच्या लेसमध्येही बघायला मिळतात.
हुडीमध्ये एगलेट का असतात?
एगलेट, दोरी किंवा स्ट्रिंग्सच्या टोकावर एक छोटा प्लास्टिक किंवा धातुचा थर असतो, ज्यामुळे टोक घासले जात नाहीत. तसेच जर ते निघालेच तर छिद्रांमध्ये पुन्हा टाकण्यासही मदत मिळते. तसेच एक डिझायनर लूकही मिळतो. हुडीमधील लेस टिकाऊ आणि बांधण्यासाठी फायदेशीर ठरतात. टोकावर असलेल्या एगलेटने स्ट्रिंग्सचे धागेही निघत नाहीत. ज्यामुळे स्ट्रिंग्स जास्त काळ टिकतात.