New Year Celebration: कुठे स्मशानभूमीत झोपून तर कुठे लाल अंडरविअर घालून केलं जातं नव्या वर्षाचं स्वागत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2021 12:27 IST2021-12-30T11:54:03+5:302021-12-30T12:27:56+5:30
New Year Celebration: न्यू ईअर जगभरात दणक्यात साजरं केलं जातं. पण अनेक ठिकाणी हे नवीन वर्षाचं स्वागत वेगवेगळ्या पद्धतीने केलं जातं. चला जाणून घेऊ जगभरात कुठे कसं केलं जातं नव्या वर्षाचं स्वागत.

New Year Celebration: कुठे स्मशानभूमीत झोपून तर कुठे लाल अंडरविअर घालून केलं जातं नव्या वर्षाचं स्वागत!
New Year Celebration: पाहता पाहता २०२१ हे वर्षही संपलंय. हे वर्ष आपल्यासोबत काही चांगल्या तर काही वाईट आठवणी घेऊन संपलं. लोक २०२२ च्या स्वागतासाठी तयार आहेत. न्यू ईअर जगभरात दणक्यात साजरं केलं जातं. पण अनेक ठिकाणी हे नवीन वर्षाचं स्वागत वेगवेगळ्या पद्धतीने केलं जातं. चला जाणून घेऊ जगभरात कुठे कसं केलं जातं नव्या वर्षाचं स्वागत.
- चिलीमध्ये लोक नवीन वर्षाच्या सुरूवातीला स्मशानभूमीत झोपायला जातात. लोक असं करतात कारण असं केल्याने त्यांच्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळेल, अशी त्यांची मान्यता आहे.
- स्वित्झर्लॅंडमध्ये लोक भाग्य चांगलं रहावं आणि सुख-समृद्धी कायम रहावी म्हणून नव्या वर्षाला आइसक्रीम एकमेकांना शेअर करतात.
- साऊथ अमेरिकेत लोक नव्या वर्षाला रंगीत अंडरविअर घालतात. असं करणं लोक चांगलं मानतात. खासकरून लोक लाल रंगाची अंडरविअर घालून नव्या वर्षाचं स्वागत करतात.
- रोमानियामध्ये लोक नवीन वर्षाचं स्वागत अस्वलासारखा ड्रेस घालून डान्स करतात. यामागे अशी मान्यता आहे की, नव्या वर्षात वाईट आत्म्यांपासून सुटका मिळेल. रोमानियातील कथांमध्ये अस्वलांना फार महत्व आहे.
- डेन्मार्कमध्ये लोक नव्या वर्षाचं स्वागत आपल्या मित्र आणि शेजाऱ्यांच्या दारात भांडी तोडून करतात. या देशात अशी मान्यता आहे की, नव्या वर्षाच्या सकाळी तुमच्या दारात जेवढी भांडी तुटतील तेवढं तुमचं भाग्य चांगलं होईल.