Weird Culture: बाळाला जन्म दिल्यावर गर्भनाळ खातात चीनमधील महिला, बाळाच्या नाभितून हे काढून बनवतात सूप

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 03:26 PM2021-07-19T15:26:24+5:302021-07-19T15:26:49+5:30

चीनमध्ये याला प्लेसेंटोफॅगी (Placentophagy or Placentophagia) म्हटलं जातं. तेथील लोकांचं मत आहे की, प्लेसेंटा (Placenta) मध्ये फार जास्त पोषक तत्व असतात.

Weird Culture of eating placenta in china and cooking it in soup | Weird Culture: बाळाला जन्म दिल्यावर गर्भनाळ खातात चीनमधील महिला, बाळाच्या नाभितून हे काढून बनवतात सूप

Weird Culture: बाळाला जन्म दिल्यावर गर्भनाळ खातात चीनमधील महिला, बाळाच्या नाभितून हे काढून बनवतात सूप

Next

चीनमधील (China) लोकांच्या पिण्याच्या सवयींबाबत सर्वांनाच माहीत आहे. कुत्र्याच्या मासापासून जिवंत प्राणी चीनमधील लोक सहज खातात. पण तेथील एक अशी परंपरा आहे ज्याबाबत वाचून तुम्ही हैराण व्हाल. या परंपरेनुसार, बाळाच्या जन्मानंतर आई गर्भनाळ (Placenta eating) खाते.

चीनमध्ये याला प्लेसेंटोफॅगी (Placentophagy or Placentophagia) म्हटलं जातं. तेथील लोकांचं मत आहे की, प्लेसेंटा (Placenta) मध्ये फार जास्त पोषक तत्व असतात. ज्यामुळे लोक हे खाताता. इतकंच नाही तर अनेकदा प्लेसेंटा हॉस्पिटलमधून चोरीही होतात. चोर बाहेर याला मोठ्या किंमतीत विकतात. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, या देशात प्लेसेंटा औषधांप्रमाणे मोठ्या किंमतीत विकलं जातं. सोबतच याला सुकवून औषधाप्रमाणे विकलं जातं आणि अनेक लोक याचं सूप बनवूनही पितात.

चीनमध्ये वर्षानुवर्षे गर्भनाळ खात आहेत लोक

मीडिया रिपोर्टनुसार, चीनमद्ये राहणाऱ्या लोकांचं मत आहे की, गर्भनाळ खाल्ल्याने महिलांना बाळ जन्माला घातल्यावर तणाव जाणवत नाही. सोबतच याने त्यांना तरूण दिसण्यासाठीही मदत होते. असंही म्हटलं जातं की, पुरूषांसाठी हा नपुंसकतेचा उपाय आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार, चीनमध्ये लोक १५०० वर्षांपासून प्लेसेंटा खातात. असं असलं तरी चीनमध्ये याच्या खाण्याने मिळणाऱ्या फायद्यांच्या दाव्याला कधी चिकित्सकांनी दुजोरा दिला नाही. उलट डॉक्टर म्हणतात की,  हे खाल्ल्याने नुकसान होतात. डॉक्टरांचं मत आहे की यात व्हायरस असू शकतात. टेक्सास यूनिव्हर्सिटी हॉस्पिटलचे डॉक्टर म्हणाले की, प्लेसेंटाने आई बाळापर्यंत पोषण फिल्टर करून पोहोचवते. त्यामुळे यात खतरनाक बॅक्टेरिया आणि व्हायरस असू शकतात. 

गर्भनाळ खाणाऱ्या मातांचे बाळ आजारी होऊ शकतात

प्लेसेंटा खाण्याबाबत २०१६ मध्ये सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अॅन्ड प्रिव्हेंशनने एक रिसर्च केला होतात. ज्यात धक्कादायक बाबी समोर  आल्या होत्या. हा रिसर्च एका अशा आईवर करण्यात आला होता जिच्या बाळाच्या रक्तात आधीपासून गंभीर संक्रमण होतं. या रिसर्चमधून समोर आलं होतं की, बाळासोबत हे तेव्हा झालं जेव्हा आई बाळाच्या जन्मानंतर रोज प्लेसेंटापासून तयार कॅप्सूल खात होती. त्यावेळी ती बाळाला दूध पाजत होती. त्यामुळे त्याच्या संक्रमण पसरलं होतं.
 

Web Title: Weird Culture of eating placenta in china and cooking it in soup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.