पुरामुळे खराब झाला लग्नाचा अल्बम म्हणून महिलेला करायचंय दुसरं लग्न, पती 'कोमात'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2021 03:17 PM2021-12-24T15:17:29+5:302021-12-24T15:18:11+5:30

Viral Video : सोशल मीडियावर एका व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एका व्यक्तीची पत्नी दुसऱ्या लग्नाबाबत बोलत आहे. याचं कारण तिचा लग्नाचा अल्बम पुराच्या पाण्यामुळे खराब झाला.

Viral Video : Wedding album spoiled due to flood so woman wants to have second marriage | पुरामुळे खराब झाला लग्नाचा अल्बम म्हणून महिलेला करायचंय दुसरं लग्न, पती 'कोमात'

पुरामुळे खराब झाला लग्नाचा अल्बम म्हणून महिलेला करायचंय दुसरं लग्न, पती 'कोमात'

Next

लग्न एकदाच होतं. त्यामुळे प्रत्येकाच्या मनात लग्नाच्या अनेक आठवणी आयुष्यभर राहतात. त्यामुळे प्रत्येकजण आपल्या लग्नातील प्रत्येक क्षण एन्जॉय करतात. लोक तर मोठ्या आवडीने लग्नाचे फोटो आणि व्हिडीओही काढतात. आपल्या लग्नाचा अल्बम लोक चांगल्या प्रकारे सांभाळून ठेवतात. असं न करणं एका व्यक्तीला चांगलंच महागात पडलं आहे. कारण त्याचा लग्नाचा अल्बम खराब झाला. आता त्याची पत्नी फोटोसाठी दुसरं लग्न करण्याची डिमांड करत आहे.

आता महिलेला करायचंय दुसऱ्यांदा लग्न

सोशल मीडियावर एका व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एका व्यक्तीची पत्नी दुसऱ्या लग्नाबाबत बोलत आहे. याचं कारण तिचा लग्नाचा अल्बम पुराच्या पाण्यामुळे खराब झाला. हा मलेशियातील व्हिडीओ ट्विटरवर व्हायरल झाला आहे. मलेशियात गेल्या आठवड्यात पुराने थैमान घातलं होतं.

पुरानंतर एक रिपोर्टर प्रभावित लोकांच्या मुलाखती घेण्यासाठी गेला होता. यावेळी महिलेने रिपोर्टरकडे आपलं दु:खं व्यक्त केलं. महिलेने रिपोर्टरला आपला लग्नाचा अल्बम दाखवला आणि म्हणाली की, पुरात तिचा लग्नाचा अल्बम खराब झाला. त्यामुळे तिला दुसरं लग्न करायचं आहे. यावेळी महिलेचा बोलण्याचा अंदाजही लोकांना आवडला.

रिपोर्टरला आपलं दु:खं सांगत महिला म्हणाली की, आपल्या जीवनात लोक एकदाच लग्न करतात. त्यांच्या लग्नाला २० वर्षे झाली आहे आणि पुरामुळे तिच्या लग्नाचे सगळे फोटो खराब झाले आहेत. व्हिडीओच्या शेवटी महिलेने ज्या अंदाजात 'अल्लाह' म्हटलं ते लोकांना फारच आवडलं. महिला तिच्या पतीला विचारताना दिसत आहे की, तू पुन्हा लग्न करू शकतो का? महिलेला दुसऱ्या कुणासोबत नाही तर आपल्याच पतीसोबत पुन्हा लग्न करायचंय जेणेकरून लग्नाचे पुन्हा फोटो काढता येतील. पण तिच्या पतीने असं करण्यास नकार दिला.
 

Web Title: Viral Video : Wedding album spoiled due to flood so woman wants to have second marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.