Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 20:06 IST2025-07-03T19:57:13+5:302025-07-03T20:06:17+5:30
या मजेदार व्हिडीओ क्लिपला सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद मिळतोय. सोशल मीडियावर व्हायरल झालेली ही रील आतापर्यंत जवळपास ३ कोटी वेळा पाहिली गेली आहे.

Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
पावसाळा आला की, गर्मीपासून सुटका मिळते खरी, पण सोबतच एक नवीन टेन्शन देखील येतं, ते म्हणजे वाळत घातलेले कपडे भिजण्याचं! अचानक ढग दाटून येतात आणि पाऊस सुरू होतो, मग धावपळ होते. हे सारं टाळण्यासाठी अनेकजण नवनवीन युक्त्या शोधत असतात. पण, सध्या सोशल मीडियावर एका दीदीचा असा 'देसी हॅक' व्हायरल झालाय, जो पाहून तुम्ही हसून हसून लोटपोट व्हाल आणि कदाचित तुमच्या मनातही येईल, 'ही कल्पना आपल्याला का नाही सुचली?'
तुमचेही कपडे छतावर किंवा बाल्कनीमध्ये वाळत घातल्यावर अचानक पावसात भिजतात का? या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा नसला तरी, इन्स्टाग्रामवर 'antim_jatin_dhiman' या अकाऊंटवरून शेअर झालेली एक रील सध्या धुमाकूळ घालत आहे.
पाण्यात न भिजण्याची गॅरंटी, पण सुकण्याची...?
या व्हायरल व्हिडीओमध्ये एक महिला पावसाळ्यात छतावर कपडे वाळत घालताना दिसते. कपडे दोरीवर टाकल्यावर ती प्लॅस्टिकचा एक मोठा तुकडा घेते आणि त्या कपड्यांवर एखाद्या छत्राप्रमाणे व्यवस्थित झाकून टाकते.
कपडे पावसात भिजायला नको!
आता या जुगाडात कपडे पावसात भिजणार नाहीत याची खात्री नक्कीच आहे, पण ते व्यवस्थित वाळतील का, याची मात्र गॅरंटी नाही. कारण पिशवीमुळे हवा खेळती राहणार नाही आणि कपड्यांना वाळायला जास्त वेळ लागू शकतो. पण, किमान अचानक आलेल्या पावसापासून कपडे वाचवण्याची धावपळ तरी टळेल हे नक्की.
कल्पना जोरदार, पण कपडे कसे सुकणार?
या मजेदार व्हिडीओ क्लिपला सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद मिळतोय. सोशल मीडियावर व्हायरल झालेली ही रील आतापर्यंत जवळपास ३ कोटी वेळा पाहिली गेली आहे, तर ३ लाखांहून अधिक लोकांनी याला लाईक केले आहे. शेकडो युझर्सनी यावर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. एका युझरने गंमतीने लिहिले की, "आयडिया तर जोरदार आहे दीदी, पण कपडे कसे सुकणार?" दुसऱ्याने म्हटले की, "अरे, माझी मम्मी पण असंच करते!" तर एकाने म्हटले, "मस्त आयडिया आहे दीदी. आता धावत जाऊन पावसापासून कपडे वाचवण्याची धावपळ करण्यापासून सुट्टी मिळेल!"