Video: चॅरिटी इव्हेंटमधून समोसा चोरी करताना दिसला प्रिन्स हॅरी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2018 13:11 IST2018-09-24T13:09:17+5:302018-09-24T13:11:41+5:30
राजा असो वा सर्वसामान्य माणून पोटाची भूक ही सर्वांनाच लाचार करते. ब्रिटीश राजघराण्यातील ३४ वर्षीय प्रिन्स हॅरीही यातून सुटला नाही.

Video: चॅरिटी इव्हेंटमधून समोसा चोरी करताना दिसला प्रिन्स हॅरी!
राजा असो वा सर्वसामान्य माणून पोटाची भूक ही सर्वांनाच लाचार करते. ब्रिटीश राजघराण्यातील ३४ वर्षीय प्रिन्स हॅरीही यातून सुटला नाही. प्रिन्स हॅरी समोसा चोरी करताना दिसला. तो पत्नी मेगन मार्केलसोबत कुकबुकच्या लॉन्चसाठी गेला होता. जेव्हा प्रिन्स हॅरी टिशूमध्ये समोसा गुंडाळत होता तेव्हा त्याला कॅमेराने टिपले.
केंसिंगटन पॅलेसमध्ये मेगन मार्केलने स्वत: हा इव्हेंट होस्ट केला होता. कुकबुकमध्ये ग्रेनेफेल टॉवर अग्निकांड-२०१७ मध्ये पीडित अनेक महिलांकडून लिहिण्यात आलेल्या रेसिपी आहेत. हे मेगनचं चॅरिटी वर्कशॉप होतं. ट्विटरवर या इव्हेंटशी संबंधित एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत प्रिन्स हॅरी सर्वांच्या नजरा चुकवत फूड स्टॉलवरुन समोसा लपवून घेऊन जाताना दिसत आहे.
Caught red-handed!
— ITV News (@itvnews) September 20, 2018
Hungry Prince Harry seems to be taking a snack home after attending the 'Together' cookbook launch with Meghan and her mother pic.twitter.com/Uta8EPB5R8
ट्विटरवर आयटीव्हीने हा व्हिडीओ शेअर केला आहे. प्रिन्स हॅरीने आपली चोरी कॅमेरात पकडली गेल्याचे पाहिले तेव्हा तेव्हा तोही हसला.