VIDEO: डॉक्टरला पाहताच भूत-भूत म्हणून ओरडला रुग्ण, पाहा नेमंक झालं काय..?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2021 14:59 IST2021-09-05T14:20:44+5:302021-09-05T14:59:04+5:30
Social Viral: या व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असून, त्यावर विविध कमेंट्सही येत आहेत.

VIDEO: डॉक्टरला पाहताच भूत-भूत म्हणून ओरडला रुग्ण, पाहा नेमंक झालं काय..?
डॉक्टरांना पृथ्वीवरील देवाचे दुसरे रुप मानले जाते. कोरोना काळात हेच डॉक्टर स्वतःचा आयुष्य विसरुन रुग्णसेवा देत होते. डॉक्टरांच्या सेवेचे काही व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक रुग्णालयातील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. पण, हा व्हिडिओ इतर व्हिडिओंपेक्षा वेगळा आहे.
सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ इतर व्हिडिओंपेक्षा काहीसा वेगळा आहे. रुग्णालयातील एक डॉक्टर पीपीई कीट घालून रुग्णाजवळ जाताच महिला रुग्ण भूत-भूत म्हणून ओरडू लागतो. त्याच्या आवाजाने बाजुला झोपलेला रुग्णही घाबरुन उठतो. तसेच, हा गोंधळ होताच रुग्णालयातील इतर डॉक्टरही येतात आणि त्या रुग्णाला समजावून सांगतात. रुग्णालयातील सीसीटीव्हीत हा हस्यास्पद प्रकार कैद झाला. व्हिडिओ खूप व्हायरल होत असून, युजर यावर व्हिडिओ कमेंट्सही करत आहेत.