अमेरिकेच्या या गावातील प्रत्येक घरासमोर कारऐवजी पार्क असतं एक विमानं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2021 15:08 IST2021-03-10T15:06:39+5:302021-03-10T15:08:48+5:30
Airparks Village : एका टिकटॉक यूजरने या ठिकाणाचा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओत स्पष्टपणे दिसतं की, या भागात प्रत्येक घरासमोर एक प्लेन उभं आहे.

अमेरिकेच्या या गावातील प्रत्येक घरासमोर कारऐवजी पार्क असतं एक विमानं!
घरासमोर बाइक किंवा कार पार्क असणे सामान्य बाब आहे. पण तुम्ही कधी अशा कॉलनीचं किंवा गावाचं नाव ऐकलंय का जिथए प्रत्येक घरासमोर गॅरेजमध्ये कार नाही तर एक प्लेन पार्क केलेला असतो. हे चित्र तुम्हाला अमेरिकेतील रेसिडेंशिअल एअरपार्क परिसरात बघायला मिळतं. एका टिकटॉक यूजरने या ठिकाणाचा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओत स्पष्टपणे दिसतं की, या भागात प्रत्येक घरासमोर एक प्लेन उभं आहे.
दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने महत्वाची भूमिका बजावली होती. अमेरिकेत १९३९ मध्ये ३४ हजार पायलट होते. पण १९४६ पर्यंत ही संख्या ४ लाखांच्या घरात गेली होती.
जेव्हा युद्ध संपलं तेव्हा बरेच एअरफील्ड आणि पायलट रिकामे झाले. ही समस्या दूर करण्यासाठी अमेरिकेतील The Civil Aeronautics Administration ने निवासी एअरपार्क बनवण्याचा निर्णय घेतला. त्याअंतर्गत बंद झालेले मिलिट्री Airstips वर रिटायर्ड मिलिट्री पायलटांना वसवण्याचा निर्णय घेतला. अशा वस्त्यांना 'फ्लाय-इन कम्यूनिटीज' म्हटलं जातं. इथे प्रत्येक घरात कारसारखंच एक विमानही असतं. या वस्तीत रस्ते इतके रूंद असतात की, एक प्लेन आणि कार विना आपसात भिडता आजूबाजूने जाऊ शकतात.
जगभरात अशाप्रकारचे ६३० निवासी Airparks आहेत. ज्यातील ६१० पेक्षा जास्त अमेरिकेत आहेत.
कॅलिफोर्नियातील कॅमरून पार्क विमानतळ निवासी Airparks पैकी एक आहे. नुकताच thesoulfamily नावाच्या एका टिकटॉक यूजरने येथील एक व्हिडीओ तयार केला होता. ज्यात घरांसमोर कारऐवजी विमान पार्क आहेत.
कॅलिफोर्नियातील Fresno चा Sierra Sky Park पहिला एअरपार्क होता. हा पार्क १९४६ मध्ये तयार करण्यात आला होता.