लग्नाआधी मेकअपसाठी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् तिकडूनच फरार झाली नवरी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2023 15:26 IST2023-06-17T15:26:26+5:302023-06-17T15:26:35+5:30
UP : आम्ही तुमच्यासाठी अजून एक वेगळी घटना घेऊन आलो आहोत. एक नवरी मेकअप करण्यासाठी ब्युटी पार्लरमध्ये गेली होती. तिथून ती तिच्या प्रियकरासोबत फरार झाली.

लग्नाआधी मेकअपसाठी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् तिकडूनच फरार झाली नवरी!
UP : सध्या ना सगळीकडे लग्नाचा सीझन सुरू आहे आणि असं झालंय की, लग्न म्हटलं की, काहीतरी अजब घटना समोर येणार हे ठरलेलंच दिसतं. दररोज लग्नातील वेगवेगळ्या विचित्र घटना समोर येतात. कधी काही दिलं नाही म्हणून नवरदेव लग्न मोडतो तर अजून काही कारणाने नवरी लग्न मोडते. आता आम्ही तुमच्यासाठी अजून एक वेगळी घटना घेऊन आलो आहोत. एक नवरी मेकअप करण्यासाठी ब्युटी पार्लरमध्ये गेली होती. तिथून ती तिच्या प्रियकरासोबत फरार झाली.
दुसरीकडे नवरदेव वरात घेऊन लग्न मंडपात पोहोचला होता. त्याला हे समजताच तो पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि त्याने पोलिसांना नवरीला शोधण्याची विनंती केली. नवरीकडील लोक नवरीचा शोध घेत आहे. अशात नवरदेवाकडील लोकांनी वरातीसाठी लागलेला खर्च परत देण्याची मागणी केली.
लग्नाच्या काही वेळाआधी नवरी ब्युटी पार्लरमधून तिच्या प्रियकरासोबत फरार झाली. इथे बेतवा घाटावरून वरात येणार होती. मुलाकडील लोक वरात घेऊन जाण्यासाठी तयार होते. तर मुलीकडील लोक वरातीचं स्वागत करण्यासाठी तयार होते. दरम्यान नवरीला मेकअप करण्यासाठी ब्युटी पार्लरमध्ये पाठवण्यात आलं होतं. तिची काकी तिच्यासोबत पार्लरमध्ये गेली होती. पण जेव्हा काकी ब्युटी पार्लरमधून एकटी घरी परतली तर एकच गोंधळ उडाला.
काकीने घरी आल्यावर नवरीच्या वडिलांना आणि नातेवाईकांना सांगितलं की, परिसरातीलच एक तरूण त्यांच्या मुलीला ब्युटी पार्लरमधून पळवून घेऊन गेला. लगेच याची माहिती नवरदेवाच्या परिवाराला देण्यात आली. त्यानंतर त्यांच्या परिवारात निराशा पसरली.
नवरदेव मोहित म्हणाला की, तो तयारी करून वरात घेऊन जाण्यासाठी तयार होता. अचानक माहिती मिळाली की, नवरी ब्युटी पार्लरमधून पळून गेली. तर नवरदेवाची आई म्हणाली की, पतीच्या मृत्यूनंतर कसेतरी पैसे जमा करून मुलाच्या लग्नाची तयारी केली होती. तेही वाया गेले. ते कोण परत देणार?
पोलिसांनी सांगितलं की, दोन्हीकडील लोक पोलीस स्टेशनमध्ये आले होते. रात्रभर पोलिसांनी नवरीचा शोध घेतला. पण कुणीही तक्रार दाखल केलेली नाही. त्यानुसार कारवाई केली जाईल.