लिफ्टमध्ये जाऊन अंडरविअरमध्ये लपवत होता वेलचीची पुडी, डी-मार्टच्या कॅमेरात कैद झाला कारनामा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 15:04 IST2025-07-07T15:03:50+5:302025-07-07T15:04:41+5:30
तरूण डी मार्टमध्ये किराणा घेण्यासाठी आला होता. त्यानं एक छोटी बास्केट घेतली आणि त्यात हव्या त्या गोष्टी टाकू लागला.

लिफ्टमध्ये जाऊन अंडरविअरमध्ये लपवत होता वेलचीची पुडी, डी-मार्टच्या कॅमेरात कैद झाला कारनामा
D-Mart Cardamom Theft: डी-मार्टमधून वस्तू चोरी केल्याच्या आणि चोर पकडले गेल्याच्या अनेक घटना नेहमीच समोर येत असतात. हैद्राबादच्या सनतनगर भागातील डी-मार्टमधील अशीच एक घटना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. चोर चोरी करण्यासाठी नेहमीच वेगवेगळ्या आयडिया करतात. इथेही एका तरूणानं असाच प्रयत्न केला. पण तो रंगेहाथ पकडला गेला. चोरानं वेलचीची पुडी आपल्या अंडरविअरमध्ये लपवली होते.
तरूण डी मार्टमध्ये किराणा घेण्यासाठी आला होता. त्यानं एक छोटी बास्केट घेतली आणि त्यात हव्या त्या गोष्टी टाकू लागला. त्यात वेलचीची पुडीदेखील होती. नंतर तो एका फ्लोरवरून दुसऱ्या फ्लोरवर जाण्यासाठी लिफ्टमध्ये गेला. लिफ्टमध्ये एकटा असल्याचा फायदा घेत त्यानं वेलचीची पुडी अंडरविअरमध्ये टाकली. पण तरूण हे विसरला की, लिफ्टमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लागला आहे. ज्यात त्याचा कारनामा रेकॉर्ड झाला. जेव्हा स्टोरच्या व्यवस्थापकाच्या हे लक्षात आलं तेव्हा त्यांनी सीसीटीव्ही फुटेज चेक केलं आणि चोरीचा खुलासा झाला.
आणखी आश्चर्यात पाडणारी बाब म्हणजे हाच तरूण काही तासांनी पुन्हा स्टोरमध्ये आला आणि पुन्हा तेच करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यानं वेलचीच्या दोन पुड्या घेतल्या. टॉयलेटमध्ये जाऊन त्यानं या पुड्या अंडरविअरमध्ये लपवल्या. पण यावेळी स्टाफ आधीच सतर्क होता. तरूण जसा बाहेर आला त्याला पकडण्यात आलं. तसेच पोलिसांना फोन करून त्यांच्या ताब्यात देण्यात आलं.
या घटनेनंतर हे दिसून आल की, सुपरमार्केट्समध्ये सुरक्षा व्यवस्था किती गरजेची असते. लिफ्ट, बाथरूम आणि बिलिंग काउंटरवर लावण्यात आलेले कॅमेरे सुरक्षेत महत्वाची भूमिका बजावतात. यातून हेही दिसून येतं की, चोरी कितीही छोटी का असेना, त्याचा परिणाम भोगावाच लागतो.