Uganda woman marries three men at once villagers want them gone | पहिलं लग्न टिकलं नाही म्हणून नंतर चक्क तीन पुरूषांशी एकत्र लग्न केलं 'या' महिलेने!
पहिलं लग्न टिकलं नाही म्हणून नंतर चक्क तीन पुरूषांशी एकत्र लग्न केलं 'या' महिलेने!

(Image Credit : Quora)

युगांडामधील एका ३६ वर्षीय महिलेची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. स्थानिक वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर या महिलेची बातमी प्रकाशित करण्यात आली आहे. कारण या महिलेने नुकतंच तीन पुरूषांसोबत लग्न केलंय. असं सांगितलं जातंय की, महिलेचं पहिलं लग्न मोडलं होतं, त्यानंतर तिने एकाचवेळी तीन पुरूषांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. ती गेल्या तीन वर्षांपासून या तिघांसोबत एकाच घरात राहत आहे.

टेसो समुदायातील धर्मगुरूची मुलगी एन ग्रेस अगुती सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे. या समुदायात एकाच पुरूषासोबत लग्न करण्याची प्रथा आहे. पण एन ग्रेसने ही प्रथा मोडली. तिने यावर सांगितले की, 'समुदायानुसार मी आधी एका व्यक्तीसोबत लग्न केलं होतं. पण माझ्या आधीच्या पतीसोबत माझं नातं आनंदी नव्हतं. मला केवळ दु:खं मिळत होतं'.

ती पुढे म्हणाली की, तिला प्रेम देणाऱ्या एका पतीचा शोध होता. एन ग्रेस अगुतीचे वडील धर्मगुरू पीटर ओगवांग म्हणाले की, त्यांच्या मुलीचं तीन पुरूषांसोबत लग्न झालं आहे. त्यांनी हेही सांगितलं की, गावकऱ्यांनी मिळून यातील एकाला पळवून लावलं होतं. अगुती तिच्या तिन्ही पतींसोबत एकाच घरात राहते. गावकऱ्यांनी या लग्नाला विरोध केला आणि तिच्या पतींना पळवण्यासाठी त्यांच्या घरीही गेले होते. पण ३६ वर्षीय एन एकटीच त्यांचा सामना करत होती. ते म्हणाले की, ती वयस्क आहे आणि तिला तिच्या जीवनाचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे.

एन ग्रेसच्या तीन पतींपैकी एक रिचर्ड एलिच एक विदूर आणि रिटायर्ड पोलीस अधिकारी आहे. दुसरा पती जॉन पीटीर ओलुका  एक संपन्न शेतकरी आहे. तर तिसरा पती मायकल इनयाकु काहीच करत नाही. हे सगळेच सहा झोपड्यांमध्ये एकत्र राहतात. एन ग्रेसने तिन्ही पतींना एक एक झोपडी दिली आहे. ग्रेस घरचे सगळे निर्णय घेते आणि तिघेही तिला साथ देतात. संपूर्ण परिवार सोबत राहतो आणि सोबत जेवण करतात.

एन ग्रेस अगुती सहा महिन्यांची गर्भवती आहे. यावेळी ती चौथ्या अपत्याला जन्म देणार आहे. पण हे स्पष्ट नाही की, तीन पतींपैकी या बाळाचे वडील कोण आहे. मात्र, या परिवाराला या गोष्टीने काहीच फरक पडत नाही. ते म्हणतात की, 'आम्ही एक परिवार आहोत आणि आमचं होणारं बाळ आमचं सर्वांचं आहे. आम्ही त्याला सगळे मिळून प्रेम देऊ'.


Web Title: Uganda woman marries three men at once villagers want them gone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.