बोंबला! एकाच तरूणासोबत लग्न करायचं म्हणताहेत या मैत्रिणी, सोशल मीडियावर टाकून दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 03:15 PM2022-03-24T15:15:13+5:302022-03-24T15:20:47+5:30

Malaysia Weird News : फेसबुकवर सेंससी मलेशिया नावाच्या पेजवर या दोन मैत्रिणींनी सांगितलं की दोघींना एकमेकींची सवत व्हायचं आहे आणि एकाच व्यक्तीसोबत लग्न करायचं आहे.

Two female friends want to marry the same man, facebook post goes viral | बोंबला! एकाच तरूणासोबत लग्न करायचं म्हणताहेत या मैत्रिणी, सोशल मीडियावर टाकून दिली माहिती

बोंबला! एकाच तरूणासोबत लग्न करायचं म्हणताहेत या मैत्रिणी, सोशल मीडियावर टाकून दिली माहिती

Next

तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की कोणतीही तरूणी तिचं प्रेम एखाद्या दुसऱ्या तरूणीसोबत वाटून घेत नाही. पण याउलट मलेशियातून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. मलेशियात (Malaysia) राहणाऱ्या दोन मैत्रिणींना एकाच व्यक्तीसोबत लग्न करायचं आहे. या दोन मैत्रिणींनी फेसबुकवर अशी पोस्ट टाकली आहे जी बघून सगळेच हैराण झालेत.

फेसबुकवर सेंससी मलेशिया नावाच्या पेजवर या दोन मैत्रिणींनी सांगितलं की दोघींना एकमेकींची सवत व्हायचं आहे आणि एकाच व्यक्तीसोबत लग्न करायचं आहे. या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे की, दोघी मैत्रिणी अशा तरूणाच्या शोधात आहे जो दोघींसोबतही लग्न करेल. त्यासोबतच दोघींनी त्यांची तरूणाबाबतची आवडही सांगितली आहे. त्यांनी लिहिलं की, त्या दोघी बेस्ट फ्रेन्ड्स आहेत आणि त्यांना एकमेकींची सवत होण्यात काहीच अडचण नाही.

फेसबुक पोस्टमध्ये दोन्ही मैत्रिणी त्यांची डिटेल माहिती दिली आहे. फेसबुक पेजनुसार, एकीचं वय ३१ आहे तर दुसरी २७ वर्षांची आहे. ३१ वर्षांची तरूणी एका मुलाची आई आहे तर २७ वर्षीय तरूणी स्वत:चा लॉन्ड्री बिझनेस चालवते. पोस्टमध्ये लिहिलं आहे की त्यांना असा पती हवा जो त्यांना त्या आहे तशा स्वीकारेल. त्यांनी लिहिलं की, कुणी जर दोन्ही पत्नी स्वीकारल्या तर त्यांना हे नातं मंजूर असेल.

त्यासोबतच या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, त्या फेसबुकवर आपलं नशीब आजमावत आहेत. जर त्यांचं नशीब चांगलं असेल तर त्यांना एखादा पुरूष मिळेल. फेसबुकवर ही पोस्ट टाकताच व्हायरल झाली आहे. पोस्टवर लोक भरभरून कमेंट्स करत आहेत. 
 

Web Title: Two female friends want to marry the same man, facebook post goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.