शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

अति घाई संकटात नेई! पहिल्याच डेटला KISS करताना मॉडलची कापली गेेली जीभ; करावी लागली सर्जरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2023 14:16 IST

Accident While Kissing : 34 वर्षीय टर्किश मॉडल सेडा एर्सोई Ceyda Ersoy ने हॉस्पिटलमधून सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला. यात तिने सांगितलं की, ती पहिल्या डेटवर गेली होती.

Accident While Kissing : आयुष्यात आपलं पहिलं प्रेम आणि पहिलं किस कधीही कुणी विसरू शकत नाही. हा अनुभव नेहमीच मनाच्या कोपऱ्यात राहतो. किसला प्रेमाचं प्रतिक मानलं जातं. पण तुर्कीच्या एका मॉडलला किस करणं फारच महागात पडलं. जोश जोशमध्ये तिच्या पार्टनरने असं जोरदार KISS केलं की, तिची जीभ कापली गेली. इतकंच काय तर तिला इमरजन्सी सर्जरी करावी लागली. मॉडलने तिचा हा अनुभव इन्स्टावर पेजवर शेअर केला.

जोशात भान विसरला पार्टनर

34 वर्षीय टर्किश मॉडल सेडा एर्सोई Ceyda Ersoy ने हॉस्पिटलमधून सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला. यात तिने सांगितलं की, ती पहिल्या डेटवर गेली होती. फ्रेंच किस दरम्यान दोघेही देहभान विसरलो. यादरम्यान तिचा पार्टनर जास्तच जोशात आला आणि इतकं जोरात किस केलं की, माझी जीभ कापली गेली. तोंडातून रक्त येऊ लागलं होतं. मला इमरजन्सीमध्ये हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं आणि एक सर्जरी करावी लागली. सेडा म्हणाली की, असंही होऊ शकतं की, मी पहिली व्यक्ती आहे जिची किस करताना जीभ कापली गेली. ही गंमत नाहीये. खूप वेदना होत आहे.

माहीत नव्हतं फ्रेंच किस कसं करायचं

द सनच्या रिपोर्टनुसार, डा एर्सोईने आपल्या फॅन्सचे धन्यवाद मानले. म्हणाली की, मी आता ठीक आहे. तुमच्या शुभेच्छांसाठी धन्यवाद. ऑपरेशन कोणत्याही अडचणीशिवाय पूर्ण झालं. डॉक्टरांनी जीभ सील केली. काही दिवस आराम करण्यास सांगितलं आहे. सेडाने तिच्या डेटबाबत सांगितलं की, कदाचित त्याला माहीत नव्हतं की, फ्रेंच किस कसं करावं लागतं. त्यामुळे इतकी गडबड झाली. मला वाटतं मी अजून त्या ठीकपणे जाणून घेऊ शकले नाही. कारण आम्हाला भेटून एक महिनाच झालाय.

सेडा एर्सोई तुर्कीची एक मॉडल आहे आणि तुर्की 2010 ची मिस फोटोमॉडल कॉम्पिटिशनची विनरही आहे. इन्स्टाग्रामवर तिचे 620,000 फॉलोअर्स आहेत. सेडाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लोक यावर वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. एका यूजरने लिहिलं की, तू काय एलिअन किंवा ड्रॅगनला किस केलं?

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल