शहरं
Join us  
Trending Stories
1
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
2
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
3
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
4
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
5
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
6
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
7
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
8
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
9
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
10
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
11
2026 Prediction: २०२६ मध्ये 'या' ५ राशींवर शनीची वक्रदृष्टी; आर्थिक, मानसिक चिंता वाढणार
12
बिहार विजयाच्या पडद्यामागे विनोद तावडेंचा हात; भाजपा मोठे बक्षीस देण्याची शक्यता...
13
मुझम्मिलचा जवळचा सहकारी मुस्तकीम सापडला; या कामासाठी ९ नोव्हेंबरला दिल्लीला आला होता, मोठा खुलासा
14
परप्रांतीय पाणीपुरी विक्रेत्याला ३ लाखात विकला BMC चा फुटपाथ; शिंदेसेनेच्या नेत्याचा अजब प्रताप
15
भारतीय हवाई दलाचे विमान तांबरमजवळ कोसळले; कोर्ट ऑफ इन्क्वायरीचा आदेश
16
ऐतिहासिक निर्णय! सरकारी, खासगी क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांसाठी दरमहा १ दिवस 'भरपगारी रजा' मिळणार...
17
बापरे! कूल वाटणारं कव्हर ठरू शकतं रिस्की; अचानक होईल स्मार्टफोनचा स्फोट, वेळीच व्हा सावध
18
Bihar Election Results: ओवेसींची एमआयएम काँग्रेसपेक्षा ठरली भारी; बिहारमध्ये कामगिरी कशी?
19
...तर मी संन्यास घेईन; प्रशांत किशोरांनी केलेली घोषणा, आता आपले वचन पाळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

कसं होतं Titanic मधील शेवटचं शाही जेवण? एकुलत्या एका मेन्यू कार्डचा नुकताच लिलाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2023 14:59 IST

Titanic Menu Card : या मेन्यू कार्डचा नुकताच लिलाव करण्यात आला. लिलावात याला एकूण 84.5 लाख रूपये किंमत मिळाली.

Titanic Menu Card : अटलांटिक महासागरामध्ये 1912 साली बुडालेल्या टायटॅनिक जहाजाची दुर्घटना आजही आठवली जाते. जहाजाचा पूर्ण मलबा आजही पाण्याखाली आणि तो काढला जाऊ शकत नाही. कारण जहाज बुडून 111 वर्ष झाली आहेत. त्यामुळे यासंबंधी छोट्या छोट्या गोष्टी विंटेज आणि खास आहेत. यात जहाजातील फर्स्ट क्लासचं मेन्यू कार्ड आहे जे जगात एकच आहे. 

या मेन्यू कार्डचा नुकताच लिलाव करण्यात आला. लिलावात याला एकूण 84.5 लाख रूपये किंमत मिळाली. मेन्यूमध्ये 11 एप्रिल 1912 ला बनवण्यात आलेल्या स्वादिष्ट डिशेजची लिस्ट आहे. यात शिंपले, साल्मन, स्क्वॅब, बदक आणि चिकनचा समावेश आहे. या डिशेज दुर्घटनेच्या तीन दिवसांआधी फॉर्मल डिनरला बटाटे, भात आणि पार्सनिप प्यूरीसोबत देण्यात आल्या होत्या. यात एक डिश व्हिक्टोरिया पुडिंग होती, जी पीठ, अंडी, जाम, ब्रांडी, सफदचंद, चेरी, साखर आणि मसाल्यांचं एक स्वीट डिश आहे. याला खुबानी आणि फ्रेंच आयसक्रीमसोबत दिलं जातं. हे मेन्यू विल्टशायरच्या हेन्री एल्ड्रिज अॅन्ड सन द्वारे लिलाव करण्यात आलेल्या कलेक्शनचा भाग होतं. ज्यात टायटॅनिकच्या इतरही काही वस्तू होत्या.

कुठे सापडलं टायटॅनिकचं मेन्यू कार्ड?

या मेन्यूला डोमिनियन, नोवा स्कोटियाचे एक स्थानिक इतिहासकार लेन स्टीफेंसन यांच्या 1960 च्या दशकातील एका फोटो अल्बममध्ये शोधण्यात आलं होतं. लिलाव कंपनीने मॅनेजर एंड्रयू एल्ड्रिज यांनी सांगितलं की, टायटॅनिकचं हे मेन्यू जगातील एकच आणि खास आहे. त्यांनी सांगितलं की, हे सापडल्यानंतर मी टायटॅनिकच्या अनेक संग्राहकांसोबत बोललो. पण मला दुसरं मेन्यू कुठेच सापडलं नाही. हे मेन्यू कार्ड जहाजाचं स्मृती चिन्ह आहे.

आजही तिथेच पडलं आहे टायटॅनिक जहाज

टायटॅनिक एक विशाल समुद्री जहाज होतं. ज्याबाबत सांगण्यात आलं होतं की, ज्याला देवही बुडवू शकत नाही. याची लांबी 269 मीटर होती आणि हे स्टीलपासून बनवण्यात आलं होतं. यावर साधारण 3300 लोकांची थांबण्याची व्यवस्था होती. ज्याल चालक दल आणि प्रवाशांचा समावेश होता. पण जेव्हा हे ब्रिटनकडून अमेरिकेकडे जात होतं. तेव्हाच अटलांटिक महासागरात त्याचा अपघात झाला. ज्यानंतर काही तासांमध्येच विशाल जहाज बुडालं. आजही त्याचा मलबा तिथेच पडला आहे आणि तो काढला जाऊ शकत नाही. आता वेळोवेळी यासंबंधी वेगवेगळी माहिती समोर येत असते. 

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके