डेटिंगसाठी श्रीमंत म्हाताऱ्याच्या शोधात होती तरुणी अन् डेटिंग साईटवर सापडले स्वत:चेच वडील!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2021 08:55 PM2021-10-24T20:55:39+5:302021-10-24T20:58:28+5:30

२२ वर्षीय अवा लुई शुगर डॅडी डेटिंग वेबसाइटवर स्वत:साठी एका श्रीमंत वृद्धाच्या शोधात होती, मात्र जेव्हा तिच्या समोर तिच्याच वडिलांची प्रोफाइल आली आणि ती थक्क झाली.

tiktok influencer finds her dad on sugar daddy dating website gets shocked | डेटिंगसाठी श्रीमंत म्हाताऱ्याच्या शोधात होती तरुणी अन् डेटिंग साईटवर सापडले स्वत:चेच वडील!

डेटिंगसाठी श्रीमंत म्हाताऱ्याच्या शोधात होती तरुणी अन् डेटिंग साईटवर सापडले स्वत:चेच वडील!

Next

आयुष्यात अनेक वेळा आपल्याबाबतीत अशा काही घटना घडतात, ज्याची आपण कधी सुतराम कल्पनाही केलेली नसते. असाच काहीसा प्रसंग TikTok Influencer Ava Louise च्या बाबतीत घडला आहे. तिच्यासोबत जे घडले ते खरोखरच विचित्र होतं. २२ वर्षीय अवा लुई शुगर डॅडी डेटिंग वेबसाइटवर स्वत:साठी एका श्रीमंत वृद्धाच्या शोधात होती, मात्र जेव्हा तिच्या समोर तिच्याच वडिलांची प्रोफाइल आली आणि ती थक्क झाली.

टिकटॉकवर अवा लुईसने डेटिंग वेबसाइटवर तिच्यासोबत ही विचित्र घटना कशी घडली हे सांगितलं आहे. तिनं टिकटॉक व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की, हा खूप त्रासदायक अनुभव होता. अवा सांगते की ती स्वत: श्रीमंत पुरुषांशी डेट करण्यासाठी या वेबसाइटचा वापर करते जेणेकरून तिला महागड्या भेटवस्तू मिळतील, परंतु तिचे वडील तिला येथे सापडतील अशी तिला अजिबात अपेक्षा नव्हती. हा एक धक्कादायक वाईट अनुभव होता.

परदेशातील वृद्ध श्रीमंत पुरुषांना आपल्यापेक्षा लहान वयाच्या मुलींना डेट करायला आवडते आणि यासाठी वेबसाईटही तयार करण्यात आली आहे. वृद्ध पुरुष आणि तरुण मुली यांच्यातील डेटिंग संबंधांना शुगर डॅडी डेटिंग म्हणतात. मुली महागड्या भेटवस्तू आणि चांगल्या जीवनशैलीसाठी अशा नात्यांमध्ये येतात. Ava Louis देखील याच उद्देशासाठी ही डेटिंग वेबसाइट वापरते. तिच्या वडिलांचे प्रोफाइल येथे पाहिल्यानंतर, अवाने त्याला 'हाय डॅडी' चा मेसेजही पाठवला, त्या बदल्यात त्यांनी अवाला ब्लॉक केलं आणि त्याबद्दल कधीही बोलले नाही. मुलीनं तिच्या आईलाही याबद्दल सांगितलं, त्यानंतर तिनं सांगितलं की, वडिलांनी तिच्यासाठी एक महागडं ब्रेसलेट आणलं आहे.

अवाने शेअर केलेला हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. काही लोकांनी तिच्याशी घडलेल्या प्रकरणावर शोक व्यक्त केला, तर बऱ्याच लोकांनी त्यांच्यासोबत या वेबसाईटवर आलेले प्रसंग शेअर केले. एका युजरनं सांगितलं की, त्याला अशा वेबसाइटवर त्याचे सावत्र काका सापडले, तर कोणी सांगितले की त्याला त्याचे शाळेतील शिक्षक सापडले आहेत. शुगर डॅडी वेबसाईटवरील अनुभवांमुळे अवा यापूर्वी चर्चेत राहिली आहे. 

Web Title: tiktok influencer finds her dad on sugar daddy dating website gets shocked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app