भारतातील एक असं रेल्वे स्टेशन, जिथे रविवारी रेल्वेचा हॉर्न वाजत नाही, पाहा नेमकं कारण आणि कोणतं आहे स्टेशन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 12:04 IST2026-01-05T12:04:04+5:302026-01-05T12:04:40+5:30
Railway Interesting Facts : एका अशा रेल्वे स्टेशनबाबत आज आपण जाणून घेणार आहोत, जिथे रविवारी रेल्वेचा हॉर्न वाजवला जात नाही. चला तर मग पाहुयात यामागचं कारण काय आहे.

भारतातील एक असं रेल्वे स्टेशन, जिथे रविवारी रेल्वेचा हॉर्न वाजत नाही, पाहा नेमकं कारण आणि कोणतं आहे स्टेशन
Railway Interesting Facts: भारतीय रेल्वे दिवसेंदिवस आधुनिक सोयी-सुविधा वाढवण्यावर भर देत आहे. भारतीय रेल्वेने आतापर्यंत अनेक आव्हानात्मक कामे केली आहेत. ज्यामुळेच भारतीय रेल्वे जगातील सगळ्यात मोठ्या रेल्वे नेटवर्कपैकी एक आहे. देशभरात रेल्वे स्टेशनांचा विस्तार, जुन्या रेल्वे स्टेशनांचा चेहरामो-मोहरा बदलून टाकला आहे. पण आजही असे काही रेल्वे स्टेशन असे आहेत, जे जुन्या दिवसांची आठवण करून देतात. एका अशाच रेल्वे स्टेशनबाबत आज आपण जाणून घेणार आहोत, जिथे रविवारी रेल्वेचा हॉर्न वाजत नाही. चला तर मग पाहुयात यामागचं कारण काय आहे.
रेल्वे सेवा आणि रविवार अनेकदा असं बघितलं जातं की, रविवारी काही रेल्वे उशिराने येतात किंवा कॅन्सल होतात. त्यामुळे रविवारी रेल्वेने प्रवास करण्याआधी रेल्वेचं स्टेटस आधी चेक करणं गरजेचं मानलं जातं. कारण भारतीय रेल्वेकडून दर रविवारी ट्रॅकच्या दुरूस्तीचं काम करण्यासाठी मोठे ब्लॉक घेतले जातात. ज्यामुळे रेल्वेच्या वेळापत्रकावर याचा प्रभाव पडतो. पण या ब्लॉकचा उद्देश इतर दिवसांमध्ये सेवा सुरळीत मिळावी हा असतो.
कोणत्या स्टेशनवर रविवारी हॉर्न वाजत नाही?
भारतात एक असं रेल्वे स्टेशन आहे जिथे रविवारी रेल्वे हॉर्न किंवा शिटी वाजत नाही. हे रेल्वे स्टेशन पश्चिम बंगालच्या वर्धमान जिल्ह्यात आहे. रिपोर्ट्सनुसार, वर्धमानपासून साधारण ३५ किलोमीटर अंतरावरील या स्टेशनवर केवळ बांकुडा-मासाग्राम पॅसेंजर रेल्वे थांबते, पण रविवारी ही रेल्वे सुद्धा येत नाही आणि स्टेशनवर पूर्णपणे पिन ड्रॉप सायलेन्स राहतो, म्हणजे ना रेल्वेचा हॉर्न वाजत ना कोणती सूचना दिली जात.
रविवारी स्टेशन बंद का असतं?
रविवारी स्टेशन मास्टरला रेल्वेचे तिकीट खरेदी करण्यासाठी वर्धमान शहरात जावं लागतं. त्यामुळेच स्टेशनवर तिकीट काउंटर आणि सगळ्या सेवा या दिवशी बंद राहतात. या स्टेशनचं आणखी एक वेगळेपण म्हणजे या स्टेशनला नावच नाहीये. नाव नसूनह सुद्धा हे स्टेशन प्रवाशांसाठी खूप महत्वाचं ठरतं. कारण हे स्टेशन बांकुडा आणि मासाग्राम दरम्यान प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाचा दुवा आहे. स्थानिक लोक दावा करतात की, असे छोटे स्टेशन आधई दूर राहणाऱ्या लोकांच्या सोयीसाठी बनवले जात होते.
पहाटे ३ वाजता रेल्वेचा हॉर्न का वाजतो?
रिपोर्ट्सनुसार, रेल्वेचा हॉर्न पहाटे ३ वाजताही प्रामुख्याने सुरक्षेच्या कारणांसाठी वाजवला जातो. उदा. रुळांवर असलेली माणसं किंवा प्राणी यांना सावध करण्यासाठी, लेव्हल क्रॉसिंग ओलांडताना, स्टेशनवरून निघताना आवश्यक सिग्नल देण्यासाठी. रात्री किंवा पहाटे अनेकदा लोक किंवा प्राणी अनवधानाने रुळांच्या जवळ असतात. अशावेळी हॉर्न त्यांना सावध करतो आणि सुरक्षित अंतर ठेवण्याचा इशारा देतो. मुख्यपणे लोको पायलटला नियंत्रण ठेवायचे असेल किंवा एखादी आपत्कालीन स्थिती असेल, तर हॉर्न देणे अत्यावश्यक ठरते.
हॉर्न वाजवण्याची इतर मुख्य कारणे समजून घ्या
रात्री किंवा पहाटे रुळांच्या जवळ माणसं किंवा प्राणी (हत्ती, जनावरे इ.) असू शकतात. हॉर्नमुळे अपघात टळतो. ज्या ठिकाणी फाटक नसलेली लेव्हल क्रॉसिंग असते, तिथे हॉर्न वाजवणे कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक आहे. लोको पायलट आणि गार्ड यांच्यातील संवादासाठी हॉर्न वापरला जातो. उदा. तीन छोटे हॉर्न = आपत्कालीन स्थिती, तर इतर पॅटर्न ब्रेक चेक किंवा रेल्वे सुरू करण्यासाठी असतात. स्टेशनवरून निघण्यापूर्वी गार्डला सिग्नल देण्यासाठीही हॉर्न वाजवला जातो.