हे विवाहित कपल प्रत्येक रात्री बदलतं पार्टनर, शेअर केला एकमेकांच्या पत्नीसोबतचा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2023 15:20 IST2023-02-21T15:18:13+5:302023-02-21T15:20:43+5:30
Married Couple Changes Partner Every Night : हे दोन्ही कपल सोबत राहतात आणि आपल्या परिवाराचं पालन-पोषण करतात. त्यांना पार्टनरच्या अदला-बदलीमध्ये काहीच अडचण नाही. दोन्ही कपलने फोरसम रिलेशनबाबत स्वत:च खुलासा केला आहे.

हे विवाहित कपल प्रत्येक रात्री बदलतं पार्टनर, शेअर केला एकमेकांच्या पत्नीसोबतचा व्हिडीओ
Married Couple Changes Partner Every Night : वाईफ स्वॅपिंगबाबत तुम्ही सिनेमांमधून तर ऐकलं असेलच. आपल्या देशात याकडे वाईट दृष्टीने पाहिलं जातं. पण काही लोकांना याचा काही फरक पडत नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच दोन विवाहित कपलबाबत सांगणार आहोत. जे दर रात्री त्यांचा पार्टनर बदलतात. हे दोन्ही कपल सोबत राहतात आणि आपल्या परिवाराचं पालन-पोषण करतात. त्यांना पार्टनरच्या अदला-बदलीमध्ये काहीच अडचण नाही. दोन्ही कपलने फोरसम रिलेशनबाबत स्वत:च खुलासा केला आहे.
एलिसिया आणि टायलर रोजर्स आधीच दोन मुलांचे पालक होते. लग्नाच्या काही वर्षांनंतर या कपलने विवाहित मित्र सीन आणि ताया हार्टलेससोबत एक रोमॅंटिक नातं सुरू केलं. अमेरिकेतील हे दोन्ही कपल 2020 पासून सोबत राहतात. हे नातं सुरू केल्यानंतर एलिसिया आणि ताया यांनी मुलांना जन्म दिला.
या दोन्ही महिलांना हे माहीत नाही की, जैविक रूपाने त्यांच्या मुलांचे वडील कोण आहेत. तायाने नुकतंच टुडे डॉट कॉमला सांगितलं की, 'आम्ही हे सुनिश्चित करण्यासाठी सगळं काही करायला तयार होतो की, प्रत्येकाला एकसमान आई-वडिलांसारखं वाटावं. याने काही फरक पडत नाही की, मुलांचे जैविक पिता कोण आहेत'.
आठ सदस्यांची ही फॅमिली आता लेबनाना आणि ओरगॉनमध्ये राहते. फॅमिली आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर नेहमीच त्यांचे व्हिडीओ शेअर करत असते. कपलने त्यांचा एक व्हिडिओही शेअर केला आहे. ज्यात चौघेही एकमेकांसोबत दिसत आहेत.
कपलने सांगितलं की, टिकटॉकवर त्यांचे 120,000 आणि इंस्टाग्रामवर 30,000 फॉलोअर्स आहेत. चौघांनीही हे मान्य केलं की, त्यांना त्यांच्या नात्यावरून अनेकदा टीकेचा सामना करावा लागतो. चौघांवरही वेगवेगळे आरोप केले जातात. टायलर आणि एलिसिया यांचे दोन्ही मुलं या वातावरणात सहज आहेत. एलिसियाने सांगितलं की, आमच्या मुलांना आधीच माहीत होतं की, आम्ही सीन आणि तायाला डेट करत आहोत.
कपल म्हणाले की, आम्ही एकमेकांपासून खूप वेगळे आहोत. पण हे ठीक आहे. तसेच आम्ही आमच्या मुलांना सांगितलं आहे की, त्यांना जे बनायचं आहे ते बनू शकतात.