Railway Interesting Facts : देशातील जास्तीत जास्त लोकांचं शहरातल्या शहरात म्हणा किंवा शहराबाहेर म्हणा प्रवासासाठी रेल्वेचा पहिलं प्राधान्य असतं. देशातील जास्तीत जास्त लोक रेल्वेने प्रवास करतात. कारण रेल्वेचा प्रवास आरामदायक आणि सोबतच खिशाला परवडणारा असतो. आपणही अनेकदा रेल्वेने प्रवास केला असेल. बरेच लोक नेहमीच रेल्वेने प्रवास करतात, पण अनेकांना रेल्वेसंबंधी काही गोष्टी माहिती नसतात. ज्या फार आवश्यक असतात. आज आम्ही रेल्वेसंबंधी अशीच एक खास माहिती आपल्याला देणार आहोत. अनेकदा आपण पाहतो की, काही लोक रेल्वेच्या बोगी आणि कोचला एकच समजतात. पण या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या असतात. आता या दोन्हीत काय फरक असतो हेच आपण समजून घेणार आहोत.
कोच काय असतो?
रेल्वेचा कोच असा डबा असतो ज्यात आपण आणि इतर लोक प्रवास करतात. एकाच रेल्वेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कोच असतात. जास्तीत जास्त रेल्वेत जनरल कोच, स्लीपर कोच आणि एसी कोच बघायला मिळतात. एसी कोचही तीन प्रकारचे असतात, ज्यात 1st, 2nd, 3rd AC असा फरक असतो. त्याशिवाय एसी चेअर कोचही रेल्वेत असतो.
बोगी म्हणजे काय?
बऱ्याच लोकांना हेच वाटतं की, कोच म्हणजेच बोगी. कोच आणि बोगी दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. कदाचित आपल्याला कल्पना नसेल, पण रेल्वेच्या डब्याखाली चाकांसह जे स्ट्रक्चर असतं, त्याला बोगी म्हणतात. बोगीवरच रेल्वेचे कोच टिकून असतात आणि एक कोचमध्ये २ बोगी लावलेल्या असतात. एका बोगीमध्ये ४ किंवा मग ६ चाकं लावलेली असतात. बोगीमध्ये ब्रेक डिस्क आणि सस्पेंशनसारख्या गोष्टी लागलेल्या असतात. तेच कोच रेल्वेच्या डब्याला म्हटलं जातं. ज्यात दोन भाग असतात एक म्हणजे कंपार्टमेंट आणि दूसरा लॉन. कम्पार्टमेंट ८ सीट्सच्या एका भागाला म्हटलं जातं. तर मधला जो भाग असतो तो कॉरिडोर असतो, त्याला लॉन म्हणतात.
रेल्वेच्या चाकाचं वजन किती?
रेल्वेच्या चाकांच्या वजन हे रेल्वेच्या प्रकारानुसार आणि वापरानुसार वेगवेगळं असतं. स्टील अथॉरिटी इंडिया लिमिटेडनुसार, रेल्वेच्या एका चाकाचं वजन ३२६ किलो ते ५५४ किलोपर्यंत असू शकतं. तर सामान्य कोचच्या एका चाकाचं वजन हे ३८४ किलो आणि डिझेल इंजिनच्या चाकाचं ५२८ किलो असतं. खास बाब ही आहे की, इंजिनाची चाकं पू्र्ण रेल्वे खेचण्यासाठी जास्त मजबूत आणि जड बनवले जातात. त्यामुळे ते डब्याच्या चाकांच्या वजनापेक्षा जास्त जड असतात. चाकांची सुरक्ष फार गरजेची असते. त्यामुळे ते दर ३० दिवसांनी चेक केले जातात आणि काही बिघाड असेल तर लगेच बदलले जातात.
किती दिवसांनी बदलतात रेल्वेची चाकं?
रेल्वेची चाकं सामान्यपणे दर ३ ते ४ वर्षांनी किंवा ७० हजार ते १ लाख किलोमीटर धावल्यानंतर बदलले जातात. पण हे रेल्वेचा प्रकार आणि नियमित चेकींगवर अवलंबून असतं. ज्यामुळे दर ३० दिवसांनी चाकांची चेकींग केली जाते. मालगाड्यांची चाकं हे ८ ते १० वर्षात बदलली जातात.
Web Summary : Many mistake railway coaches and bogies. A coach is the passenger compartment, while a bogie is the wheel structure supporting it. Coaches contain compartments and corridors. Wheel weight varies by train type, checked monthly and replaced every 3-4 years or 70,000-100,000 km.
Web Summary : कई लोग रेलवे कोच और बोगी को एक ही समझते हैं। कोच यात्री डिब्बा है, जबकि बोगी पहिया संरचना है जो इसे सहारा देती है। कोच में डिब्बे और गलियारे होते हैं। पहिये का वजन ट्रेन के प्रकार के अनुसार अलग-अलग होता है, जिसकी जाँच हर महीने की जाती है और हर 3-4 साल या 70,000-100,000 किमी पर बदला जाता है।