बाबोsss ... बसने धडक दिलेल्या महिलेला मिळाली तब्बल ६ अब्ज रुपयांची नुकसान भरपाई

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2024 04:22 PM2024-03-04T16:22:01+5:302024-03-04T16:29:06+5:30

Bus Accident compensation to lady: नक्की काय होतं प्रकरण?

The woman who was hit by the bus received a compensation of 6 billion rupees in USA Manhattan | बाबोsss ... बसने धडक दिलेल्या महिलेला मिळाली तब्बल ६ अब्ज रुपयांची नुकसान भरपाई

बाबोsss ... बसने धडक दिलेल्या महिलेला मिळाली तब्बल ६ अब्ज रुपयांची नुकसान भरपाई

Bus Accident compensation to lady: एखाद्या वाहनाने किंवा बसने व्यक्तिला धडक दिल्याची घटना घडली, तर त्या व्यक्तिला नुकसान भरपाई दिली जाते. अशीच एक घटना न्यूयॉर्कमधील मॅनहॅटनमध्ये घडली. एका महिलेला एक बसने धडक दिली होती, त्या महिलेला तुरळक नव्हे तर खूप मोठी नुकसान भरपाई देण्यात आली. ही रक्कम कोणालाही आश्चर्यचकित करेल. महिलेला तब्बल ६ अब्ज रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली. Aurora Beauchamp असे त्या महिलेचे नाव आहे.

नक्की काय घडला होता प्रकार?

मिळालेल्या माहितीनुसार, अरोरा ब्यूचॅम्प नावाच्या महिलेला बसने धडक दिली. कॅन्सरग्रस्त महिला उपचारासाठी रुग्णालयात जात असताना सात वर्षांपूर्वी हा अपघात घडला होता. रस्ता ओलांडत असताना बसने महिलेला धडक दिली त्यावेळी महिला बससोबत लांबपर्यंत फरफटत ओढले. या अपघातात महिला गंभीर जखमी झाली. त्या महिलेला रुग्णालयात नेण्यात आले. महिला अर्धांगवायू होऊन अपंग झाली आणि एका अपघाताने तिचे संपूर्ण आयुष्य बदलून गेले.

महिलेचे म्हणणे काय?

६८ वर्षीय ब्यूचॅम्प यांनी सांगितले की, २०१७ मध्ये मॅनहॅटनच्या लोअर ईस्ट बाजूला त्यांना मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्टेशन अथॉरिटीच्या बसने धडक दिली आणि लांब अंतरापर्यंत ओढत नेले. या अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली. डावा पाय पॅरालाइज झाला. त्यामुळे त्यांना चालण्यास देखील खूप अडचणी आल्या.

एकूण किती नुकसान भरपाई

महिलेने सिटी ट्रान्झिट एजन्सीविरुद्ध खटला दाखल केला होता. या महिलेने सात वर्षे कायदेशीर लढा दिला. त्यानंतर शहरातील ज्युरीने विचारविनिमय करून महिलेच्या बाजूने निकाल दिला आणि एजन्सीला तिला ७२.५ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजे सुमारे ६ अब्ज रुपये भरपाई देण्यास सांगितले.

Web Title: The woman who was hit by the bus received a compensation of 6 billion rupees in USA Manhattan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.