जगातील एक असा एकुलता एक देश ज्याला नाही राजधानी, जाणून घ्या कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 16:25 IST2025-06-09T16:17:37+5:302025-06-09T16:25:32+5:30

Interesting Facts : या देशाचं नाव आहे नाउरू, हा देश दक्षिण प्रशांत महासागरामध्ये माइक्रोनेशिया भागात आहे.

The only country in the world that has no capital | जगातील एक असा एकुलता एक देश ज्याला नाही राजधानी, जाणून घ्या कारण...

जगातील एक असा एकुलता एक देश ज्याला नाही राजधानी, जाणून घ्या कारण...

Knowledge News: जगातील प्रत्येक देशाचं आपलं एक वेगळेपण आहे. काही देश आपल्या संस्कृतीसाठी फेमस आहेत, तर काही तेथील नियमांसाठी तर काही देश लोकसंख्येसाठी फेमस आहेत. देशातील वेगवेगळ्या शहरांचं तसंच वेगळेपण असतं. देशात एक असं शहर असतं, जिथून देशाचा कारभार चालतो. या शहराला राजधानी म्हटलं जातं. प्रत्येक देशाला राजधानी असते. पण जगात एक असाही देश आहे, ज्याला राजधानीच नाही.

या देशाचं नाव आहे नाउरू, हा देश दक्षिण प्रशांत महासागरामध्ये माइक्रोनेशिया भागात आहे. हा एक छोटासा द्वीपीय देश आहे. भलेही नाउरू एक देश आहे, पण या देशाला राजधानीच नाही. कारण नाउरूचं क्षेत्रफळ केवळ २१ वर्ग किलोमीटर इतकंच आहे आणि येथील लोकसंख्या १० हजार आहे. व्हॅटिकन सिटी आणि तुवालुनंतर हा जगातील तिसरा सगळ्यात कमी लोकसंख्या असलेला देश आहे. या देशातील लोक आजही नारळाच्या शेतीसारखे पांरपारिक व्यवसायावर अवलंबून आहेत.

भलेही नाउरूला राजधानी नाही. पण यारेन जिल्हा देशाच्या मुख्य प्रशासनाचं केंद्र मानला जातो. इथे संसद भवन, विमानतळ आणि इतर सरकारी कार्यालये आहेत. याच कारणानं यारेनला अनधिकृतपणे देशाच्या राजधानीचा दर्जा मिळाला आहे. नाउरू देश एकेकाळी फॉस्फेटचं खणण करण्यासाठी प्रसिद्ध होता. या देशाल भरपूर पैसे मिळाला, पण नंतर खनिज संपल्यावर येथील अर्थव्यवस्था कमजोर झाली. आता हा देश ऑफशोर बॅकिंग आणि व्हिसा करार याद्वारे कमाई करतो. 

इतका छोटा असूनही नाउरू ऑलम्पिक आणि कॉमनवेल्थ गेम्समध्ये भाग घेतो. येथील अधिकृत चलन ऑस्ट्रेलियन डॉलर आहे. देशातील पांढऱ्या वाळूचे समुद्र किनारे आणि कोरल रीफमुळे पर्यटक या देशाकडे आकर्षित होतात. हा देश भलेही छोटा असेल पण अनोखी ओळख आणि संघर्षशील नागरीकांमुळे त्याला जगाच्या नकाशावर वेगळं स्थान आहे.
 

Web Title: The only country in the world that has no capital