प्रायव्हेट पार्टसोबत 'असा' खेळ करणं तरूणाला पडलं महागात, डॉक्टरांना थेट करावं लागलं ऑपरेशन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2021 12:52 IST2021-10-21T12:52:01+5:302021-10-21T12:52:25+5:30
घटनास्थळी पोहोचलेल्या मेडिकल टीमने ट्यूब कापण्याचा प्रयत्न केला. पण त्याला त्यात यश मिळालं नाही. कारण ट्यूब फार टाइट होती.

प्रायव्हेट पार्टसोबत 'असा' खेळ करणं तरूणाला पडलं महागात, डॉक्टरांना थेट करावं लागलं ऑपरेशन
थायलॅंडमध्ये (Thailand) एका व्यक्तीला आपला अति शहाणपणा चांगलाच महागात पडला. आधी त्याला असह्य वेदना सहन कराव्या लागल्या आणि नंतर हॉस्पिटलमध्ये जाऊन ऑपरेशनचा सामना करावा लागला. झालं असं की, २० वर्षीय तरूण आपल्या प्रायव्हेट पार्ट एका ट्यूबमध्ये टाकून चेक करत होता की, त्याची साइज मोठी आहे की नाही. अशातच त्याचा प्रायव्हेट पार्ट ट्यूबमध्ये फसला आणि मग काढण्यासाठी ऑपरेशन करावं लागलं.
‘डेली स्टार’ च्या रिपोर्टनुसार, या व्यक्तीने प्रायव्हेट पार्ट मोठा करण्यासाठी एक इंजेक्शन घेतलं होतं. त्याला हे जाणून घ्यायचं होतं की, इंजेक्शनचा काही फायदा झाला की नाही. हे चेक करण्यासाठी त्याने आपला प्रायव्हेट पार्ट ट्यूबमध्ये टाकला. पण तो त्यात अडकला. बराच वेळ त्याने प्रायव्हेट पार्ट काढण्याचा प्रयत्न केला. पण त्याला यश आलं नाही. यानंतर त्याने इमरजन्सी सेवेला कॉल केला.
मेडिकल टीमही अपयशी
घटनास्थळी पोहोचलेल्या मेडिकल टीमने ट्यूब कापण्याचा प्रयत्न केला. पण त्याला त्यात यश मिळालं नाही. कारण ट्यूब फार टाइट होती आणि थोड्या चुकीमुळे तरूणाचा प्रायव्हेट पार्ट कापला जाऊ शकत होता. यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. जिथे डॉक्टरांनी सर्जरी करून ट्यूब काढली. यासाठी तरूणाच्या प्रायव्हेट पार्ट आणि ट्यूबच्या मधे एक प्रोटेक्टिव शीट टाकली गेली. जेणेकरून तरूणाला जखम होऊ नये. त्यानंतर हळूहळू ट्यूब कापली.
मूर्खपणात खर्चही झाला मोठा
तरूणाने डॉक्टरांना सांगितलं की, त्याला वाटत होतं की, त्याचा प्रायव्हेट पार्ट छोटा आहे. त्यामुळे बरेच पैसे खर्च करून इंजेक्शन घेतलं होतं. तो हेच चेक करत होता की, इंजेक्शनचा काही फायदा झाली की नाही. तरूणाला त्याने जे केलं त्याचा आता पश्चाताप होतोय आणि सोबतच रागही येतोय की, ट्यूब काढण्यासाठी त्याला भरमसाठ खर्चही करावा लागला. अजून हे स्पष्ट झालं नाही की, तरूणाचा प्रायव्हेट पार्ट आधीसारखा सामान्यपणे काम करू शकेल की नाही.