बदल्याची आग! गर्लफ्रेंडचा कारनामा, बॉयफ्रेंडचं सामान चोरलं, अख्खं घरच जाळलं; नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2022 13:01 IST2022-11-24T12:53:04+5:302022-11-24T13:01:11+5:30
रागाच्या भरात एक तरुणीने थेट आपल्या बॉयफ्रेंडचं घरच जाळलं आहे.

फोटो - Facebook@Bexar Country Sheriffs Office
गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडमध्ये अनेकदा विविध विषयांवर वाद होतात. कधी कधी तिसऱ्या व्यक्तीमुळे नात्याला तडा जातो. अशीच एक घटना आता समोर आली आहे. रागाच्या भरात एक तरुणीने थेट आपल्या बॉयफ्रेंडचं घरच जाळलं आहे. अमेरिकेमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. टेक्सासच्या बेक्सर काऊंटी शेरिफच्या पोलिसांनी एका तरुणीला आपल्या बॉयफ्रेंडचं घर जाळल्याप्रकरणी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 वर्षीय तरुणी रात्री दोन वाजता गुपचूप आपल्या बॉयफ्रेंडच्या घरात शिरली. यानंतर तिने संपूर्ण घरात पेट्रोल टाकलं आणि घराला आग लावली. आग लावण्याआधी तिने घऱातील काही वस्तू देखील चोरल्या आहेत. सीनॅडा मॅरी सोटो असं या तरुणीचं नाव असून तिला अटक करण्याचं आल्याची माहिती पोलिसांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून दिली आहे.
संतापलेल्या सोटोने बॉयफ्रेंडच्या घराला लावली आग
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोटोने आपल्या बॉयफ्रेंडला फेसटाइम केलं असता, दुसऱ्या महिलेने कॉल उचलला. सोटोला हे अजिबात आवडलं नाही. ती प्रचंड चिडली. ही महिला तिच्या बॉयफ्रेंडची नातेवाईक असल्याचं समोर आलं आहे. दुसऱ्या महिलेचा फोनवर आवाज ऐकल्यानंतर संतापलेल्या सोटोने बॉयफ्रेंडच्या घराला आग लावली. तिने लिव्हिंग रुमममधील सोफ्याला सर्वात प्रथम आग लावली, जी नंतर संपूर्ण घरात पसरली.
आगीमुळे 50 हजार डॉलर्सचं नुकसान
घराला लागलेली आग सीसीटीव्हीत कैद झाली आहे. यामध्ये तरुणी घऱात आग लावत असल्याचं दिसत आहे. आगीमुळे 50 हजार डॉलर्सचं नुकसान झालं आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. आग लावल्यानंतर सोटोने बॉयफ्रेंडला फेसटाइम करत आग लावल्याचं दाखवलं होतं. तसेच काही वेळाने फोन कट केला. यानंतर पोलिसांनी सोटोला अटक केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"