तरूणीला खांद्यावर काढून हवा होता छोटासा हार्टचा टॅटू, टॅटूवाल्याने केला भलताच कारनामा!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 06:34 PM2022-03-29T18:34:17+5:302022-03-29T18:34:57+5:30

अनेकदा टॅटू काढणारा असं काही करतो की, त्या टॅटूचा अर्थच बदलून जातो. भल्याभल्या टॅटू आर्टिस्टकडूनही ही चूक होते.

Tattoo artist make wrong tattoo on women shoulder | तरूणीला खांद्यावर काढून हवा होता छोटासा हार्टचा टॅटू, टॅटूवाल्याने केला भलताच कारनामा!

तरूणीला खांद्यावर काढून हवा होता छोटासा हार्टचा टॅटू, टॅटूवाल्याने केला भलताच कारनामा!

googlenewsNext

आजकाल शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर टॅटू काढण्याची फारच क्रेझ बघायला मिळते. तरूणाईत ही क्रेझ अधिक बघायला मिळते. वेगवेगळे अर्थपूर्ण टॅटू ते काढतात. पण अनेकदा टॅटू काढणारा असं काही करतो की, त्या टॅटूचा अर्थच बदलून जातो. भल्याभल्या टॅटू आर्टिस्टकडूनही ही चूक होते.

टिकटॉकवर टायना मॉनिक नावाच्या महिलेने तिच्यासोबत झालेल्या एका टॅटू ब्लंडरची स्टोरी शेअर केली आहे. टायनाला तिच्या खांद्यावर हार्ट शेपचा टॅटू काढयचा होता. तो फारच सोपा होता. तिने आर्टिस्टला स्पष्ट सांगितलं की, तिला फार साधा आणि हार्ट शेप असलेला टॅटू हवा. पण टॅटू आर्टिस्टला आपली कला दाखवण्याचं मन होतं. मनमानी कारभार करून त्याने टायना टॅटू बिघडवून टाकला.

टायनाने टॅटू आर्टिस्टला स्पष्ट सांगितलं होतं. की, तिला हार्टची आउटलाइन असलेला साधा टॅटू हवा आहे. पण आर्टिस्टने तिच्याकडे दुर्लक्ष करत आपली क्रिएटीव्हिटी दाखवली. या नादात टायना खिल्लीचं कारण बनली. त्याने त्याची आयडिया टॅटूमध्ये टाकली. आर्टिस्टने टॅटूमध्ये दोन क्लीअर स्पॉट्स टाकले. जे फारच वाईट दिसत होते. टायनाने ऑनलाइन सुरू असलेला ट्रेन्ड “what I wanted vs what I got” मध्ये तिचा व्हिडीओ शेअर केला.

टायनाने तिच्या व्हिडीओमध्ये स्पष्ट सांगितलं की, तिला केवळ ब्लू आउटलाईन असलेला छोटासा हार्ट शेपचा टॅटू हवा होता. पण तिला अंदाजही नव्हता की, यातही इतकी मोठी गडबड होईल. लोकांनी जेव्हा टॅटू आर्टिस्टची कलाकारी पाहिली तर ती संतापली. अनेकांनी आर्टिस्टला कमेंट करून सुनावलं. एकाने टायनाला सल्ला दिला की, आर्टिस्टकडे हा टॅटू रिमुव्ह करण्यासाठीचे पैसे माग. 
 

Web Title: Tattoo artist make wrong tattoo on women shoulder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.