शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

सॅलेड विकून महिन्याला लाखो कमवत आहे पुण्याची ही महिला, ३ हजारात सुरू केला होता बिझनेस....

By अमित इंगोले | Published: January 15, 2021 2:26 PM

पुण्यात राहणाऱ्या मेघा यांना रिअल इस्टेटमधील मोठा अनुभव आहे. याच क्षेत्रात त्यांना पुढे काम करायचं होतं. पण त्यांना तो विचार सोडून सॅलडचा व्यवसाय करायचं ठरवलं.

जास्तीत लोकांना सॅलड खाणं पसंत असतं. याच सलादचा व्यवसाय करून पुण्यातील एका महिलेने नवा उद्योग उभारला आहे. ३ हजार रूपयात सुरू केलेल्या या व्यवसायातून या महिलेने गेल्या साधारण ४ वर्षात २२ लाख रूपयांची कमाई केली आहे. या महिलेचं नाव आहे मेघा बाफना. पुण्यात राहणाऱ्या मेघा यांना रिअल इस्टेटमधील मोठा अनुभव आहे. याच क्षेत्रात त्यांना पुढे काम करायचं होतं. पण त्यांना तो विचार सोडून सॅलडचा व्यवसाय करायचं ठरवलं.

खास बाब ही आहे की, त्यांनी २०१७ मध्ये आपल्या बिझनेसची सुरूवात घरातूनच केली होती. सर्वातआधी त्यांनी चार ओळींची एक क्रिएटीव्ह जाहिरात तयार केली. ही लोकांच्या व्हॉट्सअॅपवर शेअर केली. लवकरच मेघा यांना त्यांची पहिली ऑर्डर मिळाली. पहिल्या दिवशी त्यांना ५ ऑर्डर मिळाल्या. त्यांच्या मित्रांनीच हे ऑर्डर केलं होतं. पुढे हे ऑर्डर वाढत गेले आणि मेघा यांचा व्यवसाय वाढत गेला. मेघा आता एक यशस्वी बिझनेस वुमन झाल्या आहेत.

(Image Credit _ YouTube)

दैनिक भास्करनुसार, मेघासाठी हे यश मिळवणं सोपं नव्हतं. यासाठी त्यांना कठोर मेहनत करावी लागली. रोज सकाळी त्या साडे चार वाजता उठून सॅलेडचे पॅकेट तयार करत होत्या. भाज्या आणण्यापासून ते मसाला तयार करण्यापर्यंत सगळी कामे स्वत: मेघा यांनी केली. अनेकदा तर त्यांना नुकसानही झालं. पण मेघा यांनी काम बंद केलं नाही. मेहनतीला फळ मिळालं आणि मेघा महिन्याला ५ ते ७ हजार रूपये कमाई करू लागल्या.

(Image Credit : DainikBhaskar)

हळूहळू ग्राहक वाढले तर नफाही वाढला. लॉकडाऊनच्या आधीपर्यंत त्यांच्याकडे २०० नियमित ग्राहक झाले होते. आता मेघा महिन्याला ७५ ते १ लाख रूपये बचत करतात. गेल्या चार वर्षात त्यांनी २२ लाख रूपये कमाई केली आहे. 

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीJara hatkeजरा हटकेPuneपुणेbusinessव्यवसाय