'हा' आहे जगातला सर्वात विषारी मासा, एक थेंब विषाने घेऊ शकतो कित्येकांचा जीव...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2019 01:00 PM2019-11-18T13:00:13+5:302019-11-18T13:07:34+5:30

जगभरात असे अनेक जीव-जंतू असतात जे इतके विषारी असतात की, ते तुमचा जीवही घेऊ शकतात. अशाप्रकारच्या विषारी जीवांमध्ये एका माशाचा समावेश आहे.

Stone fish poisonous fish whose even a drop of poison will destroy the entire city | 'हा' आहे जगातला सर्वात विषारी मासा, एक थेंब विषाने घेऊ शकतो कित्येकांचा जीव...

'हा' आहे जगातला सर्वात विषारी मासा, एक थेंब विषाने घेऊ शकतो कित्येकांचा जीव...

googlenewsNext

जगभरात असे अनेक जीव-जंतू असतात जे इतके विषारी असतात की, ते तुमचा जीवही घेऊ शकतात. अशाप्रकारच्या विषारी जीवांमध्ये एका माशाचा समावेश आहे. स्टोन फिश असं या माशाचं नाव असून हा एक समुद्री मासा आहे. 

स्टोन फिश दगडासारखी दिसते त्यामुळेच तिला स्टोन फिश म्हटलं जातं. आणि याच कारणामुळे अनेकजण या माशाला ओळखू शकत नाही आणि याचे शिकार होतात. जर चुकूनही या माशावर कुणाचा पाय पडला तर जेवढं वजन त्याच्यावर पडलंय तेवढ्याच प्रमाणात हा मासा विष सोडतो.

हे विष इतकं घातक असतं की, जर कुणी या माशावर पाय दिला तर त्या व्यक्तीचा पाय कापावाच लागेल. थोडं जरी दुर्लक्ष केलं गेलं तर जीवही जाऊ शकतो. या माशावर पाय ठेवताच ०.५ सेकंदाच्या वेगाने हा मासा विष सोडतो. या माशाचं विष इतकं विषारी आहे की, एक थेंब संपूर्ण गावाच्या पाण्यात टाकला तर प्रत्येकाचा जीव जाऊ शकतो. 

कोणत्याही व्यक्तीचं शरीर या माशाच्या संपर्कात आलं तर त्या व्यक्तीचा मृत्यू निश्चित आहे. त्यामुळेच जगात आढळणाऱ्या इतक्या माशांपेक्षा हा मासा वेगळा ठरतो. हा मासा दिसायला माशासारखा दिसत नाही. तो दगडासारखा दिसतो. हा माशाचा वरचा भाग मनुष्याच्या चेहऱ्यासारखा दिसतो.


Web Title: Stone fish poisonous fish whose even a drop of poison will destroy the entire city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.