लॉकडाऊन दरम्यान सुरू होतं लग्न, पोलीस आले अन् नवरी-नवरदेवासहीत 50 पाहुण्यांना घेऊन गेले....
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2020 14:11 IST2020-04-09T14:10:20+5:302020-04-09T14:11:28+5:30
लॉकडाऊनचं उल्लंघन करून लग्न करणाऱ्या नवरी-नवरदेवाला आणि लग्नाला आलेल्या 50 पाहुण्यांना देखील अटक केलीये.

लॉकडाऊन दरम्यान सुरू होतं लग्न, पोलीस आले अन् नवरी-नवरदेवासहीत 50 पाहुण्यांना घेऊन गेले....
कोरोना व्हायरसमुळे जगातल्या अनेक देशांमध्य लॉकडाऊन करण्यात आलं आहे. तसंच लॉकडाऊन दक्षिण आफ्रिकेतही करण्यात आलं आहे. पण इथे लॉकडाऊनचं उल्लंघन करून लग्न करणाऱ्या नवरी-नवरदेवाला आणि लग्नाला आलेल्या 50 पाहुण्यांना देखील अटक केलीये.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, 48 वर्षीय जबुलानी जुलु आणि 39 वर्षीय नोमथांड्जो रविवारी एका समारंभात लग्न करत होते. पोलिसानी तिथे वेळेवर एन्ट्री घेतली आणि लग्न थांबवलं. हवेत फायरिंग करून पोलिसांनी हे लग्न थांबवलं. याचा सोशल मीडियात व्हिडीओही व्हायरल झालाय.
Part 2#Tshamakayapic.twitter.com/dD74wUIdsw
— Mhlava (@_Mhlava) April 5, 2020
व्हिडीओ आणि फोटोत कपलला अटक केल्यानंतर पोलीस व्हॅनमध्ये बसवताना दिसत आहेत. दक्षिण आफ्रिकेत कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, पोलीस माहिती मिळाली की, बंदी असूनही एक लग्न हतो आहे.
ही माहिती मिळताच पोलीस लगेच घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर नवरी, नवरदेव, धर्मगुरू आणि लग्नात सहभागी झालेल्या 50 पाहुण्यांना अटक करण्यात आली. नंतर सर्वांना जामिनावर सोडण्यात आलं.
दक्षिण आफ्रिकेत कोरोना व्हायरसच्या 1,845 केसेस समोर आल्या आहेत आणि आतापर्यंत 18 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सरकार वेगवेगळे उपाय करत आहे.