Snake Farming मधून कोट्यवधीचा व्यवसाय; या गावातील लोक वर्षाला कमवतात 100 कोटी रुपये...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2022 17:29 IST2022-12-13T17:12:25+5:302022-12-13T17:29:49+5:30
Snake Business: ज्याप्रकारे कुकुटपालन आणि मत्स्य पालन केले जाते, त्याचप्रमाणे सापांनाही पाळले जाते.

Snake Farming मधून कोट्यवधीचा व्यवसाय; या गावातील लोक वर्षाला कमवतात 100 कोटी रुपये...
Snake Video: जगभरात विविध प्राणी पाळून त्यांचा व्यवसाय केला जातो. यातील बहुतांशी प्राणी पाळीव किंवा धोकादायक नसतात. पण, या जगात काही असे देश आहेत, जिथे लोक चक्क विषारी साप पाळतात. तुम्हाला ऐकून विश्वास बसणार नाही, हे सापच तेथील लोकांना वर्षाला कोट्यवधी रुपयांची कमाई करुन देतात.
कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय
ज्याप्रकारे कुकुटपालन आणि मत्स्य पालन केले जाते, त्याचप्रमाणे सापांनाही पाळले जाते. या व्यवसायाला स्नेक फार्मिंग (Snake Farming) म्हणतात. सापांना पाळून त्यांचे विष काढले जाते आणि हे विष लाखो-कोट्यवधी रुपयांमध्ये विकले जाते. अनेक देशांमध्ये सापांना पाळणे कायद्याने गुन्हा आहे, पण चीनमध्ये हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो.
सापाच्या विषाची मागणी
चीनमध्ये अनेकजण साप पाळतात आणि त्याच्या विषातून लाखो-करोडो रुपये कमवतात. सापाच्या विषाची मागणी जगभरात आहे, कारण याचा वापर विविध औषधे बनवायला होतो. या कामात जितकी मोठी रिस्क आहे, तितकाच मोठा फायदाही आहे. वेगवेगळ्या सापांच्या विषाची किंमत वेगवेगळी आहे.
वर्षाला कोट्यवधीची कमाई
चीनमधील एक लहान गाव Zisiqiao स्नेक फार्मिंगसाठीच ओळखले जाते. या गावातील लोक फक्त साप पाळण्याच्या व्यवसायातून वर्षाला कोट्यवधी रुपयांची कमाई करतात. मिळालेल्या माहितीनुसार, या गावातील लोकांचा वार्षिक टर्नओव्हर 12 मिलियन डॉलर (अंदाजे 100 कोटी रुपये) आहे.