३ हजार पावलं चालल्यावर ८ हजार पावलांचा फायदा देईल ही चप्पल, कोरोना वॉरिअर्सना मिळणार मोफत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2021 03:45 PM2021-04-24T15:45:20+5:302021-04-24T15:48:05+5:30

कोणत्याही शूज किंवा चप्पलमध्ये ७ तास बॅक्टेरिया चिकटलेले असतात. या चपलांना सहजपणे सॅनिटाइज केलं जाऊ शकतं.

Slippers shoes special type corona warriors patient von wellx German company PM relief fund | ३ हजार पावलं चालल्यावर ८ हजार पावलांचा फायदा देईल ही चप्पल, कोरोना वॉरिअर्सना मिळणार मोफत

३ हजार पावलं चालल्यावर ८ हजार पावलांचा फायदा देईल ही चप्पल, कोरोना वॉरिअर्सना मिळणार मोफत

Next

कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेने देशाला हादरवून सोडलं आहे. सगळीकडे मृत्युच मृत्यू, ऑक्सीजनविना लोक आपला जीव गमावत आहेत. अशात काही लोक पीडित आणि कोरोना फ्रंट लाइन वॉरिअर्सच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. जर्मनीची एक कंपनी कोरोना रूग्ण आणि कोरोना मेडिकल स्टाफला फारच खास चप्पल देणार आहे.

कोणत्याही शूज किंवा चप्पलमध्ये ७ तास बॅक्टेरिया चिकटलेले असतात. या चपलांना सहजपणे सॅनिटाइज केलं जाऊ शकतं. सामान्य रूपाने व्यक्तीला ८ हजार पावले चालण्याची गरज पडते. हे काम वन वेलेक्स जर्मनी चप्पल  घालून ३ हजार पावले चालूनही होऊ शकतं. कंपनीने दावा केला की, या चप्पल घालून रूग्ण आणि कोरोनाचे फ्रंट लाइन वॉरिअर्सना फार आराम मिळेल.

फॅक्टरीमध्ये चप्पल तयार करण्याचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. ही चप्पल ३ हजार पावलातच तुम्हाला ८ हजार पावलांचा फायदा देते. हे प्रत्येक पावलावर तुमच्या पायाच्या मांसपेशी अडीच पटीने अधिक दाबते. याने शरीरात ब्लड सर्कुलेशन आणि ऑक्सीजन वेगाने वाढतं.

कोरोना व्हायरसला लक्षात ठेवून या चपला आणि शूज बनवण्यासाठी खास प्रकारचं मटेरिअल वापरलं जातं. हे पूर्णपणे वॉशेबल आहे. हे घातल्यानंत पूर्णपणे अॅक्टिव आणि फिट रहाल. असा कंपनीने दावा केला आहे. कंपनीने देशातील गरजू कोविड रूग्ण आणि मेडिकल हेल्थ वर्कर्सना पीएम रिलीफ फंड द्वारे दान करण्याचं आवाहन करत आहे. उद्योगपती आशीष जैन म्हणाले की, कंपनी १० हजार जोड चपलाचे दान करतील. ज्यांची किंमत ५० लाख रूपयांच्या आसपास आहे. 
 

Web Title: Slippers shoes special type corona warriors patient von wellx German company PM relief fund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.