बोंबला! लग्नाच्या पहिल्या रात्रीच नवरीने बाळाला दिला जन्म, पतीने आनंदाने वाटली मिठाई; काय आहे नेमकी भानगड
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 12:39 IST2026-01-27T12:37:27+5:302026-01-27T12:39:45+5:30
Viral News : लग्नाच्या पहिल्या रात्रीनंतर सकाळीच बाळंतपण झाल्याची बातमी पसरताच घराबाहेर गावकऱ्यांची मोठी गर्दी जमली. सध्या रामपूरमध्ये हा विषय चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.

बोंबला! लग्नाच्या पहिल्या रात्रीच नवरीने बाळाला दिला जन्म, पतीने आनंदाने वाटली मिठाई; काय आहे नेमकी भानगड
Viral News : लग्नातील अनेक अचंबित करणाऱ्या घटना नेहमीच समोर येत असतात. कधी लग्नातील भांडणं तर कधी नवरी-नवरदेवांचे किस्से चर्चेचा विषय ठरत असतात. उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यातील अशीच एक धक्कादायक आणि चर्चेत असलेली घटना सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. येथे एका तरुणाचे लग्न झाले आणि मधुचंद्राच्या रात्रीनंतरच अवघ्या ६ तासांत नववधूने एका मुलीला जन्म दिला. लग्नाच्या पहिल्या रात्रीनंतर सकाळीच बाळंतपण झाल्याची बातमी पसरताच घराबाहेर गावकऱ्यांची मोठी गर्दी जमली. सध्या रामपूरमध्ये हा विषय चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. चला, संपूर्ण प्रकरण नेमके काय आहे ते जाणून घेऊया.
ही घटना अजिमनगर पोलीस ठाणे क्षेत्रातील असून कुम्हरिया आणि बहादुरगंज ही दोन गावे सध्या चर्चेत आहेत. कुम्हरिया गावातील एका तरुणाचा बहादुरगंज येथील एका तरुणीशी सुमारे सहा महिन्यांपूर्वी साखरपुडा झाला होता. ठरल्याप्रमाणे लग्नाला अजून वेळ होता, मात्र दोन दिवसांपूर्वी अचानक ती तरुणी मुरसैना चौकीत पोहोचली आणि आपल्या होणाऱ्या नवऱ्यासोबत लगेच लग्न करण्याचा हट्ट धरला. पोलिसांनी तिला समजावून घरी पाठवले.
मात्र शनिवारी ती पुन्हा चौकीत आली आणि लग्न करण्याच्या हट्टावर ठाम राहिली. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही गावांचे ग्रामप्रधान – कुम्हरियाचे अफरोज अली खान आणि बहादुरगंजचे बबलू यांना बोलावले. तरूण-तरूणीचे कुटुंबियही उपस्थित राहिले. चर्चा आणि समजूत घालून रात्री सुमारे ८ वाजता दोन्ही पक्षांत तडजोड झाली. त्यानंतर अवघ्या एका तासात वर पाच जणांसह बहादुरगंज येथे गेला आणि वधूला घरी घेऊन आला.
पण खरा धक्का तर त्यानंतर बसला. रात्री सुमारे १२ वाजता वधूच्या पोटात अचानक तीव्र वेदना सुरू झाल्या, त्यामुळे घरातील सर्वजण घाबरले. तातडीने जवळच असलेल्या एका महिला डॉक्टरांना बोलावण्यात आले. डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी केली आणि रविवारी पहाटे घरात बाळाच्या रडण्याचा आवाज घुमला. चौकशीत समोर आले की नववधूने एका मुलीला जन्म दिला आहे.
लग्नाच्या पहिल्या रात्रीच नवरीचं बाळंतपण झाल्याची बातमी संपूर्ण गावात वाऱ्यासारखी पसरली. काही वेळातच घराभोवती महिलांची मोठी गर्दी जमली. विशेष म्हणजे, नवजात बाळाला कडेवर घेऊन वराने आनंदाने मिठाई वाटली. मिळालेल्या माहितीनुसार लग्न ठरल्यानंतर तरूणी होणाऱ्या नवऱ्याकडून गर्भवती झाली होती. लग्नाच्या पहिल्या रात्रीच बाळ जन्माला आल्याची ही घटना सध्या संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय बनली आहे.