मेहुणीला वश करण्यासाठी भाओजी रात्री करत होता जादूटोना, पत्नीने केलं असं काही....

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2024 13:20 IST2024-03-30T13:19:45+5:302024-03-30T13:20:12+5:30

तो त्याच्या मेहुणीला वशमध्ये करण्यासाठी रात्री 12 वाजता घरात तंत्र-मंत्र क्रिया करत होता. हा तरूण आपल्या पत्नीला मारहाणही करत होता.

Sister's husband does tantra mantra at midnight to control his wife's sister | मेहुणीला वश करण्यासाठी भाओजी रात्री करत होता जादूटोना, पत्नीने केलं असं काही....

मेहुणीला वश करण्यासाठी भाओजी रात्री करत होता जादूटोना, पत्नीने केलं असं काही....

मेहुणी आणि भाओजींच्या अनेक अजब घटना नेहमीच समोर येत असतात. यूपीच्या आग्रामधूनही अशीच एक घटना समोर आली आहे. इथे एका व्यक्तीवर आरोप आहे की, तो त्याच्या मेहुणीला वशमध्ये करण्यासाठी रात्री 12 वाजता घरात तंत्र-मंत्र क्रिया करत होता. हा तरूण आपल्या पत्नीला मारहाणही करत होता.

माहितीनुसार, या तरूणाच्या पत्नीच्या बहिणीचं लग्न त्याच्या लहान भावासोबत झालं होतं. जेव्हा पाणी डोक्याच्यावर गेलं आणि मारहाणीला कंटाळून पत्नी पोलीस कमिश्नरकडे न्यायाची मागणी केली. पोलीस आयुक्त कार्यालयाने केस कुटुंब समुपदेशन केंद्राकडे टान्सफर केली आहे.

महिलेचं लग्न जगदीशपुरा इथे राहणाऱ्या तरूणासोबत झालं होतं. दोघांचं लग्न 2013 मध्ये हिंदू रितीरिवाजानुसार झालं होतं. नंतर दोघांना दोन मुले झालीत. लग्नानंतर 4 वर्ष सगळं काही ठीक सुरू होतं. 2017 नंतर अचानक पती तंत्र विद्येच्या मागे लागला. ज्यावरून त्यांच्यात भांडणं होत होती.

पत्नीचा आरोप आहे की, तिच्या बहिणीला वशमध्ये करण्यासाठी पतीने हे कारभार सुरू केले. पत्नीने याचा विरोध केला तर तिला मारहाण केली गेली. आरोप आहे की, 2020 मध्ये पत्नीला मारहाण करून घरातून काढण्यात आलं होतं.

महिलेने काउन्सेलरला सांगितलं की, 2020 मध्ये माहेरी गेल्यावर ती अधून मधून सासरी जात होती. पण पतीमध्ये काहीच बदल न झाल्याचं पासून ती सासरी थांबली नाही.

पुढे तिने सांगितलं की, पती रात्री 12 वाजतानंतर तंत्र-मंत्राचं काम सुरू करतो. त्यानंतर अचानक मारहाण करू लागतो. महिलेने हेही सांगितलं की, आम्ही दोघी बहिणी आहोत. लहान बहिणीचं लग्न माझ्या पतीच्या लहान भावासोबत झालं होतं. 

महिलेचा आरोप आहे की, पतीचं वाईट नजर तिच्या लहान बहिणीवर आहे. पतीने मारहाण करून घरातून बाहेर काढलं आणि माझ्या लहान बहिणीसोबत अनैतिक संबंध ठेवले. तर दुसरीकडे पतीने पत्नीला मारहाण केली नसल्याचं सांगितलं.

Web Title: Sister's husband does tantra mantra at midnight to control his wife's sister