शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
2
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
3
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
4
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
5
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
6
इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
7
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
8
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
9
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
10
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
11
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
12
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
13
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
14
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
15
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
16
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
17
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
18
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
19
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
20
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

हटके ऑफर; स्मार्टफोन खरेदीवर मिळतोय 1 किलो कांदा मोफत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2019 11:09 IST

"ग्राहकांना फायदा व्हावा, या उद्देशाने ही ऑफर आणली आहे"

सध्या कांद्याचे भाव गगनाला भिडले आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी येत आहे. देशातील अनेक राज्यात कांदा 100 रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे. यातच तामिळनाडू येथील एका दुकानदाराने स्मार्टफोन विक्रीसाठी अनोखी ऑफर आणली आहे. या ऑफरनुसार, ग्राहकांनी स्मार्टफोन खरेदी केल्यास त्यांना एक किलो कांदा मोफत मिळणार आहे.

तामिळनाडू येथील पट्टुकोट्टईमधील एसटीआर मोबाईल दुकानात ही ऑफर आहे. ग्राहकांनी दुकानातून स्मार्टफोन खरेदी केला, तर त्यांना एक किलो कांदा मोफत दिला जाईल. ग्राहकांना फायदा व्हावा, या उद्देशाने आम्ही ही ऑफर आणली आहे, असे या दुकानाचे मालक सतीश यांनी सांगितले आहे. तसेच, ही ऑफर सुरु केल्यानंतर ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे, असे सतिश यांनी सांगितले. तर दुसरीकडे, स्मार्टफोन आणि कांदा दोघांचीही गरज होती. त्यामुळे या ऑफरच्या माध्यमातून स्मार्टफोन आणि कांदा खरेदी केल्याचे एका ग्राहकाने सांगितले. 

दरम्यान, सध्या तामिळनाडून कांदा प्रतिकिलो 140 रुपये दराने विकला जात आहे. मात्र, महाराष्ट्रात कांद्याच्या दरात हळूहळू घसरण होत आहे. आठवडाभरापूर्वी 160 रुपये किलो दराने मिळणारा जुना कांदा आता 140 रुपये किलोवर तर 120 रुपये दराने मिळणारा कांदा शंभरीवर आला आहे. काही दिवसांत शंभरीच्या आत कांद्याचे दर येण्याची शक्यता कांद्याच्या व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे. 

टॅग्स :onionकांदाMobileमोबाइलbusinessव्यवसाय