शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
2
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
3
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
4
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
5
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
6
इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
7
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
8
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
9
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
10
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
11
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
12
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
13
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
14
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
15
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
16
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
17
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
18
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
19
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
20
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

गाववालों! 'लग्न करून द्या, नाही तर जीव देतो', १२ तास पाण्याच्या टाकीवर 'शोले'तील वीरू बनला तरूण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2021 15:46 IST

शुक्रवारी रात्री ८ वाजता एक तरूण प्रेयसीसोबत लग्न लावून देण्याची मागणी घेऊन पाण्याच्या टाकीवर चढला. इतकंच नाही तर त्याने आत्महत्येची धमकीही दिली.

बिहारच्या सुपौलमध्ये प्रेयसीला मिळवण्यासाठी प्रियकराने 'शोले' स्टाइल आंदोलन केलं. शोले सिनेमात ज्याप्रमाणे विरू बसंतीला मिळवण्यासाठी पाण्याच्या टाकीवर चढतो तसाच हा तरूणही गावातील पाण्याच्या टाकीवर चढला. तो पाण्याच्या टाकीवर चढून रात्री ८ वाजतापासून ते सकाळी ८ वाजेपर्यंत हायव्होल्टेज ड्रामा करत राहिला. 

शुक्रवारी रात्री ८ वाजता एक तरूण प्रेयसीसोबत लग्न लावून देण्याची मागणी घेऊन पाण्याच्या टाकीवर चढला. इतकंच नाही तर त्याने आत्महत्येची धमकीही दिली. यावेळी प्रशासन त्याला लग्न लावून देऊ असं सांगत राहिलं, पण तो काही ऐकायला तयार नव्हता. तरूण कधी तरूणीला समोर आणण्याची तर कधी तिच्या वडिलांना समोर आणण्यासाठी सांगत राहिला. हेच करत रात्रीची सकाळ झाली. लोकांची मोठी गर्दी जमा झाली होती. फायर ब्रिगेडची गाडीही बोलवण्यात आली. पण तो काही खाली उतरला नाही. (हे पण वाचा : देवानेच दिली शिक्षा! मंदिरात चोरी करायला गेलेल्या चोराचे दानपेटीत अडकले हात आणि मग...)

असे सांगितले जात आहे की, प्रियकर तरूण प्रशांत कुमारचं मधुबनी जिल्ह्यातील एका तरूणीवर प्रेम होतं. तरूण आणि तरूणी लग्नासाठी तयार आहेत. पण तरूणीच्या वडिलांचा या लग्नास नकार आहे. अनेक प्रयत्न करून झाल्यावर प्रशांतने शोलेतील वीरूचा मार्ग अवलंबला आणि पाण्याच्या टाकीवर चढला. (हे पण वाचा : ठरलं तर! अडीच फूट उंचीच्या अजीमला मिळाली नवरी, वाचा काय करते मुलगी आणि बघा तिचा फोटो!)

शुक्रवारी रात्री तो हॉस्पिटल जवळच्या पाण्याच्या टाकीवर चढला. वर चढण्याआधी त्याने एक सुसाइड नोटही लिहिली होती. यातच त्याने प्रेम प्रकरणावरून  टाकीवर चढत असल्याचा खुलासा केला. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तरूणाला खाली उतरण्याची विनंती केली. पण प्रशांत या गोष्टीवर अडून राहिला की, जोपर्यंत तरूणीला तिथे बोलवून त्याचं लग्न लावून दिलं जात नाही तोपर्यंत तो खाली उतरणार नाही. इकडे सकाळ झाली पण तो टाकीवरच बसून होता. तेच जिल्हा प्रशासनाने मोठ्या प्रयत्नांनंतर त्याला सकाळी ८ वाजता टाकीवरून खाली उतरवलं. 

टॅग्स :BiharबिहारJara hatkeजरा हटके