बाबो! ४ कोटी किंमतीचं घर मालकाने स्वत:च पेटवून दिलं, कारण वाचून चक्रावून जाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2021 12:58 IST2021-06-28T12:56:08+5:302021-06-28T12:58:33+5:30

या व्यक्तीचं नाव आहे John McCorry. त्याचं घर लवकरच विकलं जाणार होतं. घर विकलं जाणार त्याच्या तीन दिवसआधी जॉनने स्वत:च त्याच्या घराला पेटवून दिलं.

Shocking! This is why man burns down his own house news from UK | बाबो! ४ कोटी किंमतीचं घर मालकाने स्वत:च पेटवून दिलं, कारण वाचून चक्रावून जाल

बाबो! ४ कोटी किंमतीचं घर मालकाने स्वत:च पेटवून दिलं, कारण वाचून चक्रावून जाल

यूकेतून एक अशी बातमी समोर आली आहे जी वाचून तुम्ही हैराण तर व्हालच सोबतच कपाळावर हात मारून घ्याल. हे वाचून तुम्ही विचारात पडाल की, अखेर दुसऱ्याचं नुकसान करण्यासाठी एखादी व्यक्ती स्वत:चं इतकं नुकसान कसं करू शकते. इथे एका व्यक्तीच्या घराला आग लागली. त्याच्या घराची किंमत ५५०,००० यूरो च्या आसपास होती. भारतीय करन्सीनुसार ही रक्कम ४ कोटी इतकी होती. आगीची चौकशी केल्यावर समोर आलं की, हे प्रकरण फारच विचित्र आहे.

या व्यक्तीचं नाव आहे John McCorry. त्याचं घर लवकरच विकलं जाणार होतं. घर विकलं जाणार त्याच्या तीन दिवसआधी जॉनने स्वत:च त्याच्या घराला पेटवून दिलं. त्याने ब्लोटॉर्चच्या मदतीने आपल्या घराला आग लावली.

काय होतं कारण?

त्याने त्याच्या घराला यामुळे आग लावली याचं हैराण करणारं कारण समोर आलं. त्याची पत्नी जी आता त्याच्यासोबत राहत नाही. तिलाही या घरात हिस्सा द्यावा लागला असता. पण जॉनला तिला हिस्सा द्यायचा नव्हता. त्यामुळे त्याने आपल्या घराला आग लावली. (हे पण वाचा : लस घेण्यासाठी पत्नी पोहोचली केंद्रावर; भीतीपोटी नवरोबा आधार कार्ड घेऊन थेट चढले झाडावर)

मीडिया रिपोर्टनुसार,  १७ जूनच्या रात्री जॉन दारू पित बसला होता. त्याच रात्री त्यांने घराला आग लावण्याचा निर्णय घेतला. त्याने या घराचे प्रिमिअमही भरले नव्हते. म्हणजे घराचा विमाही नव्हता. तेच त्याची पत्नी हिलेरी म्हणाली की, ती पती जॉनला सोडून फार आनंदी आहे. मी त्याला सोडून गेली म्हणून तो फार रागात होता. मला वाटतं त्याने हे घर मला हानी पोहोचवण्यासाठी जाळलं. 

जॉनने कोर्टात हे मान्य केलं की, त्याने मुद्दामहून त्याच्या घराला आग लावली नाही. तो त्यावेळी नशेत होता. शॉकमध्ये होता त्यामुळे ही दुर्घटना घडली. तो म्हणाला की, 'मला घटस्फोट घ्यायचा नव्हता. मला घरातून बाहेर जायचं नव्हतं. मी तिच्यासाठी आलो होतो, मी रागात नव्हतो तर मी अप्सेट होतो'.
 

Web Title: Shocking! This is why man burns down his own house news from UK