(Image Credit : chroniclelive.co.uk)

कमी वयात मुलींना बाळाला जन्म द्यावा लागल्याच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या किंवा वाचल्या असतील. पण एखादा १० वर्षांचा मुलगा बाबा आणि १३ वर्षांची मुलगी आई होणार हे तुम्ही ऐकलं नसेल. आता तुम्ही म्हणाल असं कसं? तर अशीच एक विचित्र घटना रशियात समोर आली असून या घटनेमुळे लोक हैराण झाले आहेत. 

(Image Credit : dailymail.co.uk)

रशियातील झेलेझ्नोगोर्स्क शहरातील एका १३ वर्षीय मुलीने असा दावा केला आहे की, ती एका १० वर्षाच्या मुलाच्या बाळाची आई होणार आहे. तिने एका टीव्ही कार्यक्रमात सांगितले की, ती तिच्या पोटात तिच्या १० वर्षीच्या बॉयफ्रेन्डचं बाळ आहे. ती एक वर्षाआधी या मुलाला भेटली आणि पहिल्या नजरेत हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले, असंही तिने सांगितले.

(Image Credit : dailymail.co.uk)

डारिया असं मुलीचं आणि इव्हान असं त्या १० वर्षीय मुलाचं नाव आहे. दोघेही नुकतेच एका टीव्ही कार्यक्रमात आले होते आणि त्यांच्या नात्याशी संबंधित प्रश्नांची त्यांनी थेट उत्तरे दिली. 

(Image Credit : dailymail.co.uk)

डारियाने असा दावा केला असला तरी इव्हानची टेस्ट करणाऱ्या डॉक्टरांनी तिचा दावा खोडून काढला आहे. ते म्हणाले की, इव्हान शुक्राणू निर्मित करण्यासाठी फारच लहान आहे. तो आत्ता पिता होऊच शकत नाही. मात्र, डारिया ठामपणे हे सांगते की, तिच्या पोटात असलेलं बाळ हे दुसऱ्या कुणाचं नसून इव्हानचच आहे. 

'द सन'ने दिलेल्या वृत्तानुसार, दोघेही पालकांच्या परवानगीने या कार्यक्रमात गेले होते. टीव्ही कार्यक्रमानंतर सगळीकडे दोघांचीच चर्चा रंगली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे ८ महिन्यांची गर्भवती डारिया आणि तिच्या आईची बाळाला ठेवण्याची इच्छा आहे. डारियाची 35 वर्षीय आई एलेना म्हणाली की तिच्या मुलीने स्वतःच या नात्याची कबुली दिली आहे.

दुसरीकडे इव्हानच्या आईचा देखील यावर विश्वास आहे. डारिया म्हणाली की, ती आणि तिचा प्रियकर एकमेकांची पूर्ण काळजी घेतात. दोघांनीही सोशल मीडियावर रिलेशनशिप स्टेटस मॅरीड असं ठेवलं आहे. मात्र, या जोडप्याला स्थानिक समाजातील लोकांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे.


Web Title: Shocking! Russian girl, 13, claims boy, 10, made her pregnant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.