वाघ आणि बकऱ्याची प्रसिद्ध दोस्ती तुटली, वाघाच्या हल्ल्यात जखमी तिमूरचा मृत्यू!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2019 15:15 IST2019-11-12T15:06:30+5:302019-11-12T15:15:00+5:30
काही महिन्यांपूर्वी एक वाघ आणि बकऱ्याच्या मैत्रीची चर्चा जगभरात चर्चेचा विषय ठरली होती. या अनोख्या मैत्रीने लोक आश्चर्यचकित आणि आनंदी झाले होते.

वाघ आणि बकऱ्याची प्रसिद्ध दोस्ती तुटली, वाघाच्या हल्ल्यात जखमी तिमूरचा मृत्यू!
काही महिन्यांपूर्वी एक वाघ आणि बकऱ्याच्या मैत्रीची चर्चा जगभरात चर्चेचा विषय ठरली होती. या अनोख्या मैत्रीने लोक आश्चर्यचकित आणि आनंदी झाले होते. मात्र, वाईट बातमी म्हणजे एका घटनेमुळे तिमूर नावाच्या बकऱ्याचा मृत्यू झालाय. ५ नोव्हेंबरला त्याच्या हृदयाचे ठोके थांबले. सफारी पार्कमधील कर्मचारी त्याचा जीव वाचवण्यात अयशस्वी ठरले.
वाघ अमूर आणि बकरा तिमूरची मैत्री संपूर्ण रशियात चर्चेचा विषय ठरली होती. त्यांच्या मैत्रीची उदाहरणे दिली जात होती. या दोघांची भेट पहिल्यांदा २०१५ मध्ये झाली होती. सामान्यपणे वाघासमोर बकरी येणे म्हणजे बकरीची शिकार होणार असंच होतं. पण अमूर आणि तिमूर यांच्यात असं काही झालं नाही. दोघे बराच वेळ सोबत घालवत होते. एकत्र खेळत होते.
खेळता-खेळता झालं भांडण
दरम्यान अमूरने तिमूरला म्हणजेच बकऱ्याला शिकार करण्याचंही शिकवलं होतं. दोघेही सोबत खेळत होते. तिमूरचं वय साधारण ५ वर्षे होतं. असे सांगितले जाते की, एक दिवस दोघे खेळत असताना बकरा डोंगराहून खाली पडला आणि गंभीर जखमी झाला. अमूर आणि तिमूर सोबत खेळत होते. दरम्यान बकरा वाघाच्या पाठीवर चढला आणि वाघाने त्याला पाठीवरून खाली पाडण्यासाठी धक्का दिला. दोघांमध्ये झडप झाली आणि बकरा खाली पडला.
स्मारक बनवलं जाणार
जखमी झालेल्या बकऱ्याला लगेच मॉस्कोच्या हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलं. पण वाघाने केलेल्या हल्ल्यात तो फार जास्त जखमी झाला होता. अखेर त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे सफारी पार्कमध्ये तिमूरच्या मृत्युमुळे सध्या दु:खाचं वातावरण आहे. आता तिमूरची कबर तयार केली जाणार आहे.